सातारा: छत्रपती शाहूमहाराज यांना आज अभिवादन

सातारा- युगनिर्माते छत्रपती शिवाजीमहाराज यांचे नातू आणि रणधुरंधर छत्रपती संभाजीमहाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दक्ष विचार मंचच्यावतीने येथील तख्ताचा वाडा अर्थात शाहू उद्यान येथे शुक्रवार, दि. 18 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती मंचचे ओमकार तपासे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

गत आठवड्यात छत्रपती शाहूमहाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांनी बांधलेल्या तख्ताचा वाड्यातील खलबतखान्याच्या स्वच्छतेच्या उपक्रमाला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला होता. दरम्यान, पालिका कर्मचारी व बाल शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करुन या खलबतखान्याची स्वच्छता पूर्ण केली आहे. दरम्यान, दि. 18 मे रोजी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 9.30 ते 11 या वेळेत तख्ताचा वाडा अर्थात शाहू उद्यान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी 9 वाजता बाल शिवाजी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संगममाहुली येथील छत्रपती शाहूमहाराजांच्या समाधीवरुन ज्योत आणणार असून यावेळी संगममाहुली ग्रामस्थांच्यावतीने या ज्योतीचे प्रज्वलन करण्यात येणार आहे. ही ज्योत सातारा कोरेगाव रस्तामार्गे पोवईनाक्‍यावरुन वरच्या रस्तामार्गे शाहू उद्यान येथे आणल्यानंतर ज्योतीचे मान्यवरांकडून स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.

यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. संभाजीराव पाटणे यांच्यासह तरुण इतिहास संशोधक घनश्‍याम ढाणे हे छत्रपती शाहूमहाराज यांच्या कार्याचा आढावा घेणार आहेत. तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान याच कार्यक्रमात ओमकार तपासे यांनी लिहिलेल्या सातारा नगरीचे निर्माते स्वराजविस्तारक छत्रपती शाहूमहाराज या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही होणार आहे. या कार्यक्रमाला सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दक्ष विचार मंचच्यावतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)