सातारा-चिंचणेर-तांदुळवाडी-कोरेगाव एस.टी. सुरू करा

सातारा -विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सातारा, चिंचणेर, तांदुळवाडी, कोरेगाव या मार्गावरील एस. टी. सेवा तात्काळ सुरू करावी अन्यथा ग्रामस्थांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन सातारा आगार व्यवस्थापकांना देण्यात आले. यावेळी निलेश यादव, गणेश पालखे, राजेंद्र मतकर व तांदुळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मार्गावर एस.टी सेवा उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामस्थांना सुमारे 3 ते 5 कि.मी. पायपीट करून चिंचणेर किंवा मुगाव फाटा येथे एस. टी.ची वाट पहावी लागते. तरी या मार्गावर एस. टी. सेवा सुरू करावी, अन्यथा ग्रामस्थांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)