सातारा : ग्रामीण भागात सर्रास प्लास्टिकचा वापर

शासनाच्या आदेशाची पायमल्ली


कारवाई करण्याची मागणी

नागठाणे- राज्यातील प्रत्येक गाव प्लास्टिकमुक्त व्हावे यासाठी शासनाने प्लास्टिक बंदीचा आदेश काढला आहे. परंतु, ग्रामीण भागात अजुनही मोठ्या प्रमाणात व्यापारी,दुकानदार यांच्याकडून प्लास्टिकचा वापर होत आहे. स्थानिक प्रशासन व प्रदुषण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.

ग्रामीण भागात प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी स्थानिक प्रशासन व प्रदूषण विभागाने कार्यशील राहणे आवश्‍यक आहे. विशेषतः मोठ्या बाजार पेठेच्या गावामधून सर्रास प्लास्टिकचा वापर होत असून लहान मोठे व्यापारी तसेच खाद्य पदार्थ, भाजीपाला विक्रते, फळविक्रते, कापड विक्रते यांच्याकडून हमखास प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या प्लास्टिक वापरावर शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात प्लास्टिकचा वापर वाढल्याने अस्वच्छतेने कहर केला आहे.

-Ads-

बाजारातून आणलेल्या पिशव्या काम झाल्यावर कचऱ्यात टाकल्या जात आहे. आणि हा कचरा गटारांमध्ये फेकून दिला जात आहे. त्यामुळे गावातील मोठमोठी गटारे, लहान नाले तुंबत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच ग्रामीण भागात पाळीव जनावरे ही नदी, तसेच ओढ्याच्या परिसरात चरत असतात यावेळी वाऱ्यामुळे या परिसरात आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या चाऱ्यासोबत जनावरांच्या पोटात जात आहे.

त्यामुळे जनावरांवर जीव गमावण्याचीही वेळ येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व प्रदूषण विभागाने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष न करता प्लास्टिक बंदीच्या आदेशाची पायमल्ली न होऊ देता प्लास्टिक बंदीची मोहिम कड करुन व्यापारी वर्गाकडून होणारा प्लास्किटचा वापर थांबवण्याची आवश्‍यकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)