सातारा : गोळीबार पोलिस वसाहतीला एसपींची भेट

 

सातारा शहरातील गोळीबार पोलिस वसाहतीला जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांकडून समस्या जाणुन घेतल्या. त्यानंतर वसाहतीतील इमारती व रस्त्याची पाहणी केली.

-Ads-

गोळीबार वसाहतीमध्ये सुमारे तीस इमारती व दोनशे पोलिस कुटुंब राहतात. मात्र ही वसाहत ना सातारा पालीकेच्या हद्दीत येत, ना विलासपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत. त्यामुळे रस्त्याच्या मुख्य समस्येसह कचऱ्याच्या समस्येने या वासहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रस्त्यावर पडलेल्या अनेक खड्ड्यामुळे रात्री अपरात्री बंदोस्तासाठी जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या समस्येविरोधात दै.प्रभात’ने यापुर्वी अनेकदा आवाज उठवला होता.

त्याची दखल घेत जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास गोळीबार वसाहतीला भेट दिली. त्यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याकडून त्यांनी समस्या जाणुन घेतल्या.

त्यानंतर या वसाहतीचा रस्त्याचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याचे पंकज देशमुख यांनी सांगितले. तसेच वसाहतीतील नागरिकांना मॉर्नींग वॉकसाठी ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही पंकज देशमुख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)