सातारा: गाळ काढून विकासाचे जलसाठे निर्माण करूया

गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी व इतर

अन्यथा ब्लॅक लिस्ट
आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आदर्की ( खु ) येथील सिमेंट नाला बांधाचे काम सुरु असताना भेट दिली. या बांधकामासाठी अतिशय निकृष्ट दर्जाच्या वाळूच्या ढिगाकडे त्यांचे लक्ष गेले … त्यांनी ही वाळू नाही यात अर्धी अधिक माती आहे ही ताबडतोब बदलून घ्या. पुन्हा गिट्टी ही गिट्टी नसून मोठमोठे दगड आहेत हे पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. अशी गिट्टी आणि वाळू वापराल तर हा बांध लगेच लिकेज होइल आणि येत्या पावसाळ्यातच हे सगळे वाहून जाईल. ताबडतोब ही वाळू आणि गिट्टी बदलून वापरा. असे कोणाचे पुन्हा काम दिसले तर अशा लोकांना आपण ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू अशी तंबीच जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिका-यांच्या आवाहनाला वेळोशी गावाचा प्रतिसाद

सातारा – फलटण तालुक्‍यातील अर्वषणग्रस्त गाव असलेल्या वेळोशीला जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी गुरूवारी भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी 1972 च्या दुष्काळात निर्माण झालेल्या तळ्यात आपण उभे आहोत तिथे पुढच्या वर्षी या दिवशी पाणी दिसले पाहिजे एवढा जलसाठा निर्माण करु या असे आवाहन केले. आत्ताच ही संधी आहे, गाळ काढू या. प्रशासन तुमच्या सोबतीला आहे. हे जलसाठे विकासाचे स्त्रोत आहेत याची जाणिव ठेवू या. असे ही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यावर लोकांनी होकार भरला आणि हमी दिली. 30 हजार घनमीटर गाळ काढू , वेळोशी पाणीदार करु असा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर , प्रांत संतोष जाधव , लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवदास, अनुलोमच्या सुजाताताई मराठे , जि. प. सदस्य सौ. जिजामाला निंबाळकर, तहसिलदार विजय पाटील, अनुलोमचे स्वयंसेवी संघटनेचे चंद्रकांत पवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात आता पर्यंत गाळमुक्त धरण,गाळ युक्त शिवार या अभियानांतर्गत 92 कामाला मंजूरी दिली असून 27 कामाला सुरुवात झाली आहे. वेळोशी सारख्या गावाचे हे गाळ उपसण्याचे काम बघून इतर गावातील लोकही आमच्याकडे येतील एवढे चांगले काम हे होणार आहे. जलसंधारण आता लोकचळवळ झाली आहे. लोक आता जलसंधारणाच्या कामासाठी आग्रही आहेत.

गेल्या दोन वर्षात पडलेल्या पावसामुळे जिथे जिथे जलसंधारणाची कामे झाली त्याचे खुप अनुकूल परिणाम दिसायला सुरुवात झाल्यानंतर इतर गावांनाही आमच्या गावातही लोकसहभागातून जलसंधारणाची कामे का होणार नाही, ही भावना वाढीस लागत असून त्यातून अधिक एकोप्याने आणि संघटीतपणे गावच्या गावे यात जीव ओतून काम करत आहेत. प्रशासनही त्यांच्या सोबत राहून त्यांना मदत करत असल्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)