सातारा : ‘गरज असेल तर सलाईन बाहेरुन विकत आणा…’

वडूज ग्रामीण रुग्णालयातील परिचारीकेचा फतवा ;वरिष्ठांकडून दखल घेत कारवाईचे संकेत
सातारा : गोरगरिबांना वेळेत व मोफत उपचार मिळावेत यासाठी असलेली सरकारी रुग्णालये रोज नव नव्या कारनाम्याने बदनाम होताना दिसत आहेत. असाच प्रकार वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात घडला आहे.  सोमवारी सकाळी उपचारासाठी आलेल्या एका पेशंटला सलाईन लावणे गरजेचे असल्याने ती सलाईन व आवश्यक साहित्य बाहेरुन विकत घ्या असा अजब सल्ला एका परिचारीकेने दिला.मात्र आपल्याकडे पैसे नाहीत असे पेशंटने सांगताच गरज असेल तर बाहेरुन विकत आणा असे सांगत परिचारीका निघुन गेल्याची घटना घडली आहे.

याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी युनुस शेख यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असुन त्या परिचारीकेवर व यापुढे कोणी अशा पध्दतीने पेशंटला खासगीतुन  साहित्य  खरेदी  करण्यास सांगेल त्याला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी प्रभातशी बोलताना दिला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)