सातारा : खा. उदयनराजेंचे ‘कदम’ ‘कदम’ बढाये जा!

सम्राट गायकवाड

मोहनराव कदम, माधवी कदम आणि आता अमित कदम

सातारा – खासदार उदयनराजे आणि कदम नावाच्या विजयी उमेदवारांचे दोन यशस्वी अध्याय पुर्ण झाल्यानंतर आता येत्या सातारा-जावली विधानसभा निवडणूकीतही कदम नावाचा उमेदवार उतरवून

-Ads-

खा.उदयनराजे हॅट्रीक करण्याच्या विचारात असल्याचे नुकतेच दिसून आले. सोमवारी खा.उदयनराजे यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील विकासकामांच्या भूमीपुजन कार्यक्रमांमध्ये आता जावलीचे व भाजपवासी झालेले अमित कदम सहभागी झाले होते. कार्यक्रमात कदम यांना भूमीपुजन करण्यासाठी हातात कुदळ देण्यात आली.

तसेच यापुर्वी यापुर्वी खा. उदयनराजे यांनी माजी शिक्षण सभापती अमित कदम यांना आमदार करण्याची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर अमित कदम यांचा खा.उदयनराजे यांच्या साताऱ्यातील कार्यक्रमातील सहभाग पाहता येत्या निवडणूकीत खा.उदयनराजे यांच्या कदम फॅक्‍टरची हॅट्रीक होणार का, अशी चर्चा सातारा-जावली तालुक्‍यात जोर धरू लागली आहे.

यापुर्वी झालेल्या सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक शेखर गोरे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे व अनेक कारणांनी खा.उदयनराजे समर्थकांनी सातारा व कराड मध्ये मोहनराव कदम यांना उघडपणे साथ दिली होती. परिणामी मोहनराव कदम प्रचंड फरकाने निवडून आले होते.

तद्‌नंतर झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्नी वेदांतिकाराजे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात खा.उदयनराजे यांनी साताऱ्यातील डॉ.संजोग कदम यांच्या पत्नी माधवी कदम यांना उमेदवारी देत विजयी केले. एकूणच अत्तापर्यंत खा.उदयनराजे यांचे आणि कदम नावाचे फॅक्‍टर दोन वेळा यशस्वी झाले आहेत. त्यानंतर आनेवाडी टोलनाका कारणावरून आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे समर्थकांमध्ये झालेली धुमश्‍चक्री झाली. त्यानंतर खा.उदयनराजे यांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी गैरहजर राहून आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर, येत्या काळात मनोमिलन होणार नाही, असे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी ठणकावून सांगितले तसेच वसंतराव मानकुमरे यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जावर सूचन म्हणून स्वाक्षरी करण्याची तयारी ही आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी दर्शविली.

या पार्श्‍वभूमीवर खा.उदयनराजे यांनी ही सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून अमित कदम यांच्या आमदारकीसाठी आग्रही झाल्याचे नुकतेच दिसून आले. जावली तालुक्‍यातील असले तरी अमित कदम तसे गेल्या अनेकवर्षांपासून साताऱ्यातील रहिवासी आहेत. यापुर्वी ते सातारा शहरातील राजकारणामध्ये सहभागी होताना दिसून आले नव्हते परंतु सोमवारी खा.उदयनराजे व नगरसेवकांच्या उपस्थिीत झालेल्या भूमीपुजन कार्यक्रमास अमित कदम उपस्थित राहिले तसेच त्यापुढे जावून भुमीपुजनासाठी त्यांच्या हातात देण्यात आलेली कुदळ त्यांनी सातारच्या जमीनीवर मारून एकप्रकारे विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

जावलीत आता आमदारांसह खासदार
दोन वेळा लोकसभा लढविलेले वसंतराव मानकुमरेंना आता पुन्हा एकदा लोकसभा लढविण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून खासदाकीसाठी उभा राहण्याची तयारी दर्शविली. मानकुमरेंच्या भूमिकेला आ.शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थन आहे. तर जावलीचे माजी आमदार स्व.जी.जी.कदम यांचे चिरंजीव व माजी जि.प.शिक्षणसभापती अमित कदम यांना आमदार करण्यासाठी खा.उदयनराजे यांचा आग्रह आहे. एकूणच 2009 साली झालेल्या मतदारसंघांच्या पुर्नरचनेनंतर जावली तालुका प्रतिनिधीत्वापासून वंचित होता. मात्र, दोन्ही राजेंच्या संघर्षाच्या निमित्ताने आमदारकीसह आता खासदारकी ही जावली तालुक्‍याच्या वेशीपर्यंत पोहचली आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)