चौघांवर गुन्हा दाखल, भाजप, सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

सातारा -एका मुख्याध्यापकाला खोट्या गुन्ह्याची भिती दाखवत भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत डांबून मारहाण करत 5 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी भाजपचे सातारा शहराध्यक्ष सुनील कोळेकर व शिवसेनेचे हरिदास जगदाळे ,संदीप मेळाट यांच्यासह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित चौघांनी बुधवार दि. 16 रोजी सर्किट हाऊस येथील 9 नंबरच्या खोलीमध्ये डांबुन ठेवत महिलेचा विनयभंग केल्याचे वदवुन घेत तो गुन्हा दाखल न करण्यासाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागीतली. तसेच गुन्हा दाखल करून तुझ्या घरावर महिलांचा मोर्चा काढु तुला संपवुन टाकू असे म्हणत चप्पलने मारहाण करत हे प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली व पैसे न दिल्यास रिव्हॉल्वर , तलवार असल्याचे सांगून खून करण्याची धमकीही दिल्याचे अमोल एकनाथ कोळेकर (वय 37) रा. नंदादीप सोसा.दिव्यनगरी यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
ही सर्व घटना सर्किट हाऊस येथे घडली असल्याचे तक्रारीत नमुद असल्याने व संशयित आरोपी हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने या घटनेमुळे सातारामध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)