सातारा : कॉलेज परिसरात उनाडक्‍या करणाऱ्यांना निर्भया पथकाचा दणका

सातारा शहरातील विविध महाविद्यालयाच्या आवारात उनाडक्‍या करणाऱ्या टोळक्‍यांना सातारा शहर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने चांगलाच दणका दिला. सायन्स कॉलेज, छ. शिवाजी कॉलेज, धंनजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज या परिसरात सतत टपोरींचा त्रास होत असल्याची तक्रार पोलिसांच्याकडे आली होती. त्यानुसार सातारा शहरच्या निर्भया पथकाच्या महिला उपनिरीक्षक विजया वंजारी यांना उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर सायन्स कॉलेज , छ. शिवाजी कॉलेज, धनंजयराव गाडगीळ कॉलेज व आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या बाहेर विनाकारण उनाडक्‍या करणारे, गाडीवरून विनाकारण फिरणारे, जोरजोरात हॉर्न वाजवणारे अशा 14 तरूणांना निर्भया पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर या तरूणांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज देण्यात आली आहे.

-Ads-

निर्भया पथकाने केलेल्या कारवाईने कॉलेज परिसरात तात्पुरती का होईना पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे.
महिला उपनिरीक्षक विजया वंजारी या तरूणांना मारत नाहीत. मात्र चारचौघात त्याची अशी काही झडती घेतात त्यामुळे पुन्हा पोलिस दिसले तरी उनाडक्‍या करणारे सुसाट पळ काढतात.

उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने, पो.नि. नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक विजया वंजारी महिला पो. ना. माधुरी झेंडे, चालक पो.ना. शिंदे यांनी कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
224 :thumbsup: Thumbs up
4 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)