कामेरी – अंगापूर वंदन, ता. सातारा येथे काविळीच्या आजाराची 15 जणांना लागण झाल्याचे कळताच गटविकास अधिकारी वर्ग 1 डॉ. अमिता गावंडे (पवार) यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेतली. तसेच गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी सातारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनित फाळके, आरोग्य सहायक चंद्रकांत लगंडे, विस्तार अधिकारी वसंत धनावडे, ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, पाणी पुरवठा कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी चुकीच्या पद्धतीने टीसीएलचे प्रमाण वापरणे, चुकीची पाणी वितरण व्यवस्था, तुंबलेल्या गटारातून नळ गळती अशा अनेक बाबी गांभिर्याने न घेता पाणी पुरवठा केला जात असल्याचे समोर आले. यामध्ये सुधारणा न केल्यास ग्रामविकास अधिकारी व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यानंतर खाजगी रुग्णालयातून उपचार घेतलेल्या रुग्णांची त्यांनी घरी जाऊन चौकशी केली व उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी डॉ. चंद्रकांत सापुते, निवासी वैद्यकीय अधिकारी नांदगाव, संतोष गायकवाड आरोग्य सेवक, एन. एच. मुलाणी आरोग्य साह्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, उपसरपंच श्रीमती जयश्री कणसे, ग्रामपंचायत सदस्य, अनिल कणसे, विठ्ठल यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)