सातारा : काळोशीच्या महिला बचतगटांची शेळीपालनातून भरारी 

आर्थिक प्रगतीकडे वाटचाल : पुढील काळात देशी गाईचे संगोपन करणार 
परळी: परळी खोऱ्यातील काळोशी (ता. सातारा) गावातील महिलांनी एकत्र येऊन एकता, रेणुका, श्रीगणेश, झाशीची राणी, दुर्गामाता या महिला बचत गटांची उभारणी केली. बाजारपेठेची मागणी ओळखून या गटांनी शेळीपालनास सुरवात केली असून यातून मिळणाऱ्या नफ्यातून महिलांनी आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. या भागातील उरमोडी धरणासाठी अनेक गावांचे पुनर्वसन झाले.या भागातील काळोशी हे सुमारे लोकसंख्येचे गाव.गावात बागायती क्षेत्र कमी असल्याने हंगामानुसार पिके घेतली जातात.शेतीचे क्षेत्र कमी असल्याने तरुण मुले मुंबई शहरात रोजगारासाठी गेले आहेत. या गावातील संगीता निकम या महिला पोलिस पाटील आहेत. मध्ये संगीताताईची ऍवॉर्ड संस्थेच्या सचिव नीलिमा कदम यांची भेट झाली. नीलिमाताई गावातील महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी तसेच बचत करण्यासाठी महिला बचत गटाची सुरवात करण्याचा सल्ला दिला.

गटाची स्थापना 
संगीताताईंनी गावातील महिला संघटित करून त्यांना बचत गटाची संकल्पना समजावून सांगितली. हळूहळू गावातील महिला बचत गटाच्या उभारणीस तयार होऊ लागल्याने संगीताताईचा हुरूप वाढला. ऍवॉर्ड संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकता महिला बचत गटाची स्थापना केली. या गटात महिलांचा समावेश आहे. गटाची स्थापनावेळी आर्थिक बचत हा एकमेव उद्देश ठेवण्यात आला होता. बचतीचे महत्त्व पटत जाईल तसतशी गटांची संख्या वाढत गेली. यानंतर टप्पाटप्प्याने रेणूका, श्रीगणेश, झाशीची राणी, दुर्गामाता या पाच गटांची स्थापना झाली. या गटांच्या माध्यमातून गावातील सुमारे महिला संघटित झाल्या आहेत.

गटांनी सुरू केले शेळी पालन 
महिला बचत गट हा नुसता बचतीसाठी नसून या गटाने जमा केलेल्या भांडवलातून शेती पूरक व्यवसाय करण्याचा सल्ला नीलिमाताईंनी दिला. दर महा गोळा केली जाणारी वर्गणी तसेच नाबार्डतर्फे केली जाणारी आर्थिक मदत यामुळे गटांचा भांडवलाचा प्रश्न कमी झाला. चर्चेतून अनेक व्यवसायही शोधण्यात आले. गावच्या बाजूला डोंगर आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात गवत उपलब्ध असतेच, तसेच कमी भांडवलात होऊ शकणारा व्यवसाय म्हणून महिलांनी शेळी पालनाला पहिली पसंती दिली. पारंपरिक पद्धतीने शेळीपालन न करता त्याचे अर्थशास्त्र तसेच आवश्‍यक गोष्टी समाजावून घेण्यासाठी बचत गटातील महिलांनी ऍवॉर्ड संस्थेच्या माध्यमातून दहीवडी येथील शेळी-मेंढी संशोधन केंद्र तसेच बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. शेळीपालनाचे तंत्र समजाऊन घेतले. मध्ये प्रत्येक गटातील इच्छुक तीन ते चार महिलांनी उस्मानाबादी जातीच्या दोन शेळ्यांची खरेदी करून पूरक व्यवसायास सुरवात केली.

टप्पाटप्प्याने झाली वाढ 
लहान प्रमाणात सुरू झालेला शेळीपालन व्यवसाय गटातील महिलांनी चांगल्या पद्धतीने वाढविला. दोनच्या चार, चाराच्या आठ याप्रमाणे करडांच्या संख्येत वाढ होत गेली. घराच्या बाजूस किंवा काही महिलांनी अगदी घराच्या पडवीत शेळी पालन सुरू ठेवले. टप्पाटप्प्याने शेळ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. सध्या काही महिलांकडे जवळपास पंधराच्यावर शेळ्या व बोकडांची संख्या गेली आहे. महिलांचे शेळीपालनातील कष्ट पाहून घरातील पुरुष मंडळी तसेच तरुण मुलांचेही सहकार्य मिळू लागले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या शेळीपालन व्यवसायात चांगली वाढ झाली. सध्याच्या काळात या पाच महिला बचत गटांकडे सुमारे दिडशेच्यावर शेळ्या, बोकडांची संख्या गेली आहे. वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी शेळ्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या जातात.

पुढील काळात गाईचे संगोपन 
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बचतीची सवय लागली आहे. त्याचबरोबरच शेळीपालनासारखा पूरक व्यवसाय तयार झाला. दरवर्षी एका महिलेला शेळीपालनातून तीस हजारांपर्यंत नफा मिळत असून येणाऱ्या पुढील काळात देशी गाईंचे संगोपन बचत गट करणार आहेत.

शेळीपालन टप्प्याटप्प्याने वाढवत नेले. सध्या माझ्याकडे शेळ्या आणि बोकड आहेत. गेल्या तीन वर्षांपासून बोकडांची विक्री सुरू असून यातून चांगला नफा होत असल्याने कुटुंबास आर्थिक हातभार लागला आहे.
– रेखा निकम, अध्यक्ष, रेणूका महिला बचत गट 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)