सातारा कारागृहात कैद्यांनी नाकारले अर्न्नें

सातारा – सातारा जिल्हा कारागृहात मिळत असलेल्या निकृष्ट जेवणाच्या विरोधात कैद्यांनी जेवणच नाकारले. त्यामुळे कैद्यांची खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. एकाच दिवशी 37 कैद्यांनी जेवन नाकारल्याने जेवणाच्या दर्जावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. उपोषणाला कारागृहातील वरिष्ठांनी दुजोरा दिला आहे.

जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यातील 309 बंदीवासात आहेत. त्यातील तब्बल 37 कैद्यांनी शुक्रवारी सकाळी मिळणारे जेवण नाकारले. यामुळे कारागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारागृह अधीक्षक गोविंद राठोड यांनी जेवण नाकारणाऱ्या कैद्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी जेवण निकृष्ट मिळत असल्याचा आरोप केला.

कारागृह उपहारगृहातील साहित्य बाजारभावापेक्षा दुप्पटीने मिळणे, खराब भाजीपाला असणे, असे आरोप कैद्यांनी केले. अधीक्षक राठोड यांनी जेवणाचा दर्जा सुधारण्याबरोबर उपहारगृहातील साहित्याचे दर योग्य देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतरच कैद्यांनी जेवणस घेण्यास सहमती दाखवली. शुक्रवारी सकाळ पासून सुरू असलेला हा प्रकार अधीक्षकांच्या मध्यस्तीने दुपारी मिटला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)