सातारा-कान्हरवाडी बसची फेरी पूर्ववत करा

औंध ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

औंध – सातारा-कान्हरवाडी गाडीचा मार्ग बदलल्याने औंधमध्ये येणाऱ्या विद्यार्थी व पर्यटकांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे गाडी पूर्ववत पूर्ववत सुरू व्हावी, अशी मागणी करत औंध येथील नागरिकांनी सातारा विभाग कार्यालयात जावून कोरेगाव आगाराच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला. फेरी पूर्ववत न सुरू केल्यास रस्ता रोकोचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

-Ads-

कोरेगाव आगाराने गेल्या वर्षी उत्पन्नाचे कारण पुढे करून सातारा-सांगली ही औंधमार्गे जाणारी एस बंद केली. त्यापाठोपाठ सातारा-कान्हरवाडी जाणारी कोरेगाव डेपोची गाडीही चार-पाच दिवसांपासून रहिमतपूर होऊन आर्वी नागझरी मार्गे फिरवली. त्यामुळे औंधमधील येणारे पर्यटक तसेच शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने औंध नांदोशी वडी कळंबी लांडेवाडी या गावांमधून महामंडळ अधिकाऱ्यांवर ती नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत आपली निवेदने घेऊन सातारा विभाग कार्यालयात जाऊन चाललेल्या मनमानी कारभाराचा निषेध करत औंधमार्गे जाणारी ही एसटी गाडी नेमकी कोणाच्या सोयीसाठी त्यामार्गे सुरू करण्यात आली आहे, याचा खुलासा कोरेगाव आगारप्रमुखांनी करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दोन दिवसात सुरू न झाल्यास औंध नागरिक रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी औंधच्या सरपंच सौ. नंदिनी इंगळे, उपसरपंच सचिन शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रणित निकम, शुभम इनामदार, राजू माने, राजेंद्र यादव, सचिन पवार, दीपक कदम, चंद्रकांत अवतारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)