सातारा: कलाकारांसाठीच पालिकेकडून एकांकिका स्पर्धेंचे आयोजन

खा. श्री. छ. उदयनराजे : कै. श्री. दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्‌घाटन उत्साहात
विविध सातारकर नाट्‌यकर्मीचा सत्कार

सातारा – समाजाची विविध कामे करताना समाजातील विविध कलाकारांना एक स्टेज मिळवून देत सांस्कृतिक भूक भागवण्याचे कार्यंही सातारा पालिका या एकांकिका स्पर्धेच्या उपक्रमाने करत आहे. या स्पर्धांचे आयोजन करताना कोणतेही राजकारण आम्ही करत नाही. जास्तीतजास्त लोकांना ही लोककला पहाण्यासाठी आकर्षित करणे हाच आमचा या मागचा उद्देश व प्रामाणिक इच्छा आहे. कलाकरांना संधी देण्याची इच्छा उराशी बाळगून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आज ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या सातारानगरीला राज्यात या स्पर्धांमुळे मोठे स्थान मिळाले आहे, असे उद्‌गार सातारचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.

सातारा नगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या माजी नगराध्यक्ष कै. श्री. दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध मान्यवरांचे उपस्थितीत शाहू कला मंदिरात पार पडला. यावेळी उदयनराजे बोलत होते.

या उद्‌घाटन समारंभास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, स्पर्धेच्या कार्याध्यक्ष सुजाता राजेमहाडिक, कार्यंवाह कल्याण राक्षे, स्मिता घोडके, स्पर्धेचे परीक्षक हेमांगी जोशी, वामन पंडित, सुरेश हळदीकर यांच्यासह विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराजाचे पुजन करुन या स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ सुरु झाला. यावेळी सातारच्या कलाकाराच्या हस्तेच या स्पर्धेचा नारळ फुटावा ही इच्छा खरी करुन दाखवत उदयनराजे यांनी हा मान बाळासाहेब उर्फ कल्याण राक्षे यांना देत स्पर्धेचा नारळ फोडायला लावला. त्यानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार पालिकेच्यावतीने करण्यात आले.

यावेळी सातारा येथील विविध नाट्यकर्मींचा सत्कार उदयनराजे भोसले तसेच प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये शरद व सौ. संध्या लिमये, रवींद्र डांगे, मोहन बेदरकर, रुक्‍मिणी सुतार, शरद वामळे, पळशीची पी. टी. उषा या टीमचे सर्व कलाकार यांचा समावेश होता.

नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, सौ. सुजाता राजेमहाडिक, यांनी आपले मनोगत केले. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संयोगिता माजगावकर जोशी यांनी केले. यावेळी नगरसेविका लता पवार, सुमती खुटाळे, यशोधन नारकर, स्नेहा नलावडे, स्मिता घोडके, सविता पवार, रजनी जेधे, किशोर शिंदे, विशाल जाधव, अली शेख, राजू भोसले तसेच अधिकारी कर्मचारी व नाट्यरसिक उपस्थित होते. या स्पर्धा रविवार दि. 27 पर्यंत सुरु रहाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)