सातारा: ऐतिहासिक मोती तळे म्हणावे की कचरा कुंडी?

राजधानी साताऱ्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करणे ही प्रत्येक सातारकर नागरिकांची जबाबदारी आहे. मात्र, त्या ऐतिहासिक वारसा स्थळांची नागरिकांकडूनच होणारी हेळसांड व मोती तळ्याला कचरा कुंडी बनवण्याचे कुकर्म थांबवले पाहिजे. मोती तळ्यामध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करणे हा एकमेव पर्याय म्हणून न पाहता या तळ्याची उपयोगिता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून यासाठी सातारा नगरपरिषदेने पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे.

गुरूनाथ जाधव

सातारकर नागरिकांचा सवाल, घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य

सातारा – तळ्यांचा वारसा जपणारे शहर म्हणून एक वेगळी ओळख असणाऱ्या साताऱ्यातील ऐतिहासिक मोती तळ्याला सध्या कचरा कुडींचेच स्वरुप आले आहे. परिसरातील नागरिक, व्यावसायिकांकडून तळ्यात टाकल्या जात असलेल्या घाणीमुळे तळ्यातील पाणी अक्षरश: हिरवेगार झाले असून पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येऊ लागल्याने या तळ्यास “ऐतिहासिक मोती तळे म्हणावे की कचराकुंडी?’ सवाल समस्त सातारकर नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

सातारा शहरातील जलस्त्रोतांची दुरवस्था “प्रभात’च्या माध्यमातून मांडली जात आहे. मोती तळ्याच्या परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळे वाढले आहे, प्लॅस्टिक पिशव्या, कचरा टाकला जात असल्याने तळ्याच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गधी पसरत आहे. दूषित पाण्यामुळे डांसांची उत्पत्ती वाढल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्यावतीने प्लॅस्टिक पिशव्या निर्माल्य, कचरा टाकण्यात येवू नये, याकरता चेनलिंग बांधले होते. मात्र, त्यावरून देखिल नागरिक कचरा तळयात भिरकावताना दिसत आहेत. या तळ्याच्या शेजारी असलेल्या ओढ्यामध्येही हिच अवस्था असून शेजारी असलेल्या अग्निशमन विभागाचे कार्यालय असून त्यांचेदेखील या तळ्याकडे दुर्लक्ष होत आहे. आमचा या तळ्याशी काहीच संबध नसल्याच्या आवेशात कर्माचारी वागत आहेत. नागरिकांकडून अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांसमोरच कचरा फेकला जात असतो. मात्र, हे कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेतात.

आस्था सामाजिक संस्था व सर्व कचरा वेचक श्रमिक संघाच्यावतीने मोती तळ्याची स्वच्छता मोहिम राबविली होती. त्यावेळॅ प्लॅस्टिक पिशव्या निर्माल्य कचरा मोठ्या प्रमाणात काढला होता. अभिनेते सयाजी शिंदे तसेच साताराच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी देखील यावेळी मोती तळ्याची पाहणी केली होती व याबाबत साताराच्या ऐतिहासिक जलस्त्रोतांची होणारी दुरवस्था थांबावी व त्याकरता नगरपरिषदेने त्वरीत याबाबत उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्याचा नगरपरिषदेला विसर पडला असल्यानेच या तळ्याची आज दुरवस्था झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)