सातारा : ऐतिहासिक नागझरी झरा अतिक्रमणाचा विळख्यात 

वास्तूंचे विद्रुपीकरण रोखताना संवर्धन होणार का? 
सातारा :शेकडो वर्षांपासून रंगमहालाच्या वरील भागात असलेल्या नागझरी झऱ्याला संवर्धित करण्याचे काम सातारा निर्मात्या छ. शाहू महाराजांनी केले. पुढील काळात याच झऱ्यातील पाणी रंगमहाल, अदालत वाडा आणि तख्ताच्या वाड्यात नेण्यात आले. गेल्या काही वर्षात काळाच्या ओघात शाहूंनी निर्माण केलेल्या बहुतांश वास्तू गडप झाल्या. मात्र, अद्यापही नागझरी झऱ्याचे अस्तित्व कायम आहे. झऱ्याच्या दोन्ही बाजू आणि वरच्या भागात मानवी अतिक्रमण झाल्याने पालिकेचे दुर्लक्ष अधोरेखित होत असले तरी या ऐतिहासिक झऱ्याचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याची अखेरची राजधानी असलेल्या सातारा शहराची निर्मिती झाली. यावेळी शिवनातू आणि संभाजीपुत्र शाहू राजेंनी स्वराजाचे तिसरे छत्रपती म्हणून साम्राज्य विस्तार करताना राज्यकारभार गडावरून शहरात सुरू आणला. अदालत वाडा, तख्ताचा वाडा आणि रंगमहाल त्या सुवर्णकाळाचे साक्षीदार आहेत. तत्पूर्वी किल्याच्या दगडांमधून झिरपणारे पाणी रंगमहालाच्या वरील भागात असलेल्या नागझरी झऱ्यात साचत. याच झऱ्याचा जीर्णोद्धार करताना झऱ्यालगत तटबंदी शाहू महाराजांनी उभी केली. त्यांनतर अनेक वर्षे राजघराण्याची या पाण्याचा वापर सुरू होता. काळाच्या ओघात शहराचा विस्तार झाला. वाढणाऱ्या अतिक्रमणाचा विळखा झऱ्याला पडला. आक्रमणे झेललेली वास्तू अतिक्रमणाचा जाळ्यात अडकली. नागझरी झऱ्यासारख्या कित्येक वास्तू अतिक्रमणाच्या बळी ठरल्यात. नागझरी झऱ्यावर आठही बाजूंनी अतिक्रमण झाले असले तरी पाण्याचा उपळा थांबलेला नाही. त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन होणार का, ही चिंता भेडसावत आहे. येथील अतिक्रमणे हलवताना झरा खुला करून सध्या खाजगी मिळकत असलेल्या रंगमहालाचे जर लोकार्पण झाले तर भविष्यात येथे मोठे पर्यटन निर्माण होणार आहे.

-Ads-

 पुरातन विभाग अस्तित्वात असूनही पुरातन वास्तूंवर अतिक्रमणे वाढत असल्याने ही अडचण कशी आणि कोण दूर करून या ठेव्याचे संवर्धन करणार, हा सवाल लोकांमधून उपस्थित होत आहे. 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)