सातारा : एसपींच्या पाठीवर डीजींची कौतुकाची थाप

पोलिस पब्लिक स्कूलचे उद्घाटन


महाराष्ट्राला दिशा देणारा प्रकल्प

सातारा: कायमच धावपळ अन बदलीची नोकरी असलेल्या पोलिसांच्या पाल्यांची शैक्षणिक  परवड थांबुन त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या पोलिस पब्लिक स्कूल व महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या चिमुकल्यांची त्या नोकरीला असताना सांभाळण्याअभावी परवड होऊ नये यासाठी तयार केलेल्या पाळणाघराचे बुधवारी राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी हा उपक्रम राज्याला दिशा देणारा ठरेल असा विश्‍वास व्यक्त करत एसपी संदीप पाटील यांचे कौतुक केले.

यावेळी कृष्णाचे ट्रस्टचे सुरेश भोसले, कोल्हापुर परिक्षेत्राचे महासंचालक विश्‍वास नांगरे पाटील, सातारचे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार, पोलिस उपअधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर, प्रेरणा कट्टे, खंडेराव धरणे, पो.नि नारायण सारंगकर, प्रचार्या कुलकर्णी व पोलिस कर्मचारी, पालक उपस्थित होते.

-Ads-

स्कुलचे उदघाटन झाल्यानंतर माथुर यांनी क्‍लास रूम,ग्रंथालय,डिजीटल क्‍लास व संपूर्ण शाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी माथुर यांनी विध्यार्थ्यांना शक्‍य तितके इंग्रजीमधूनच संवाद साधायला लावा व शिक्षकांनी इंग्रजीतच बोलायला हवे असे शाळेच्या प्राचार्या कुलकर्णी यांना सूचना केल्या.

पालकांची कार्यशाळा घ्या
संकुलमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचाच वापर करायला लावा कारण बहुतांशी विद्यार्थी व पालक घरी मराठीच बोलतात त्यामुळे शाळेत इंग्रजी शिकवायलाच हवे.पालकांना इंग्रजी बोलायलाच सांगा शक्‍य झाल्यास पालकांची कार्यशाळा घ्या अशा सूचना माथुर यांनी व्यवस्थापनाला केल्या.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)