सातारा : एसटीतुन दारूची वाहतूक; वाहकाला अटक

गोवा राज्यातुन महाळेश्‍वरकडे जाणाऱ्या एसटी मध्ये दारूची वाहतूक करणाऱ्या वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या वाहकाविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

महाबळेश्‍वर आगाराची बस क्रं. एम एच 14 पीटी 4631 ही बस पणजीहुन महाबळेश्‍वर जात होती. अभिजित बाळकृष्ण शिंदे रा. सुलतानपुर ता. वाई हा त्या बसचा वाहक होता. पणजी येथुन गोवा बानवटीच्या दारूच्या बाटल्या तो स्वस्तात विकत घेऊन महाबळेश्‍वरला विक्रीसाठी घेऊन जात होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याने पणजी येथून दारूच्या बाटल्या बस मध्ये ठेवल्याची माहिती सातारा पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पो.नि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. दत्ता पवार, प्रवीण पवार, अरूण दगडे, केतन शिंदे, राहुल खाडे यांनी बस सातारा बसस्थानकात येताच तपासणी सुरू केली.

तपासणी दरम्यान बसमध्ये 42 हजार रुपये किमंतीच्या गोवा बनावटीच्या 60 दारूच्या बाटल्या सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी बाटल्यासह अभिजित बाळकृष्ण शिंदे रा. सुलतानपुर ता. वाई याला ताब्यात घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)