सातारा: अण्णा हजारेंच्या संघटनेची होणार नव्याने बांधणी

संघटन नव्याने उभारी घेईल: संदीप जगताप
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास ही काळाची गरज आहे. संस्थेच्या विश्‍वस्पदावर पदावर बाबा आढाव, अविनाश धर्माधिकारी, गो.रा.खैरनार यांनी कार्य केले होते. अशा पदावर नियुक्ती होणे हे माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया संदिप जगताप यांनी दिली. संघटनेत नोकरदार, युवक तसेच सर्व क्षेत्रातील लोकांचा सहभाग व्हावा, असा आमचा प्रयत्न असून त्याची अंमलबजावणी झाल्यास संघटन नव्याने उभारी घेईल. आता यापुढे संघटनेच्या कार्यकर्त्यांना आयडी देण्याबाबतची सूचना मांडली आहे. सूचना मान्य केल्यास संघटनेच्या खऱ्या कार्यकर्त्यांची ओळख समाजाला होईल आणि संघटनेचा नाव लौकीक कायम राहण्यास सहाय्य होणार आहे, असे ही जगताप यांनी सांगितले.

विश्‍वस्तपदावर सातारच्या संदिप जगताप यांना संधी

सातारा – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास संघटनेची आता नव्याने बांधणी करण्यात येत आहे. संघटनेच्या विश्‍वस्तपदासाठी महाराष्ट्रासह देशातील मान्यवरांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार असून त्यामध्ये सातारच्या जिल्हाध्यक्षपदी कार्य केलेले संदीप जगताप यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मागील काही काळापासून सातारा जिल्ह्यातील आंदोलनांमधून दूर झालेली टिम अण्णा पुन्हा एकदा सक्रिय होणार असून येत्या काळात सामाजिक प्रश्‍नांवर आंदोलनांचा धडाका चालू होणार आहे.

नुकत्याच 15 एप्रिल रोजी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास संस्थेची बैठक झाली. बैठकीत संस्थेच्या रिक्त विश्‍वस्तपदांवर चारित्र्यशील, निरपेक्ष व सामाजिक राष्ट्रीय दृष्टीकोन असलेल्या कार्यकर्त्यांची निवड करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यामध्ये सातारचे संदिप जगताप यांची निवड करण्यात आलाचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे अण्णा हजारे यांच्या स्वाक्षरीचे पत्र संदिप जगताप यांना नुकतेच पाठविण्यात आले व निवडीसाठी सहमती विचारण्यात आली. अण्णांच्या पत्राला संदिप जगताप यांनी आवश्‍यक ती कागदपत्रांसोबत सहमती पत्र पाठवून दिले आहे. त्यामुळे जगताप यांची जवळपास विश्‍वस्तपदावर नियुक्ती झाली आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास संस्थेची नव्याने बांधणी झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील संस्थेची स्वतंत्रपणे नोंदणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे करण्यात येणार आहे. राळेणगणसिध्दी येथील मुख्य राष्ट्रीय कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्याला करावयाचे कार्य व आंदोलनांची रूपरेषा ठरवून देण्यात येणार आहे. त्यानुसार आता पुन्हा एकदा साताऱ्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ही आंदोलनाचा धडाका सुरू होणार होणार आहे. आज पर्यंत किमान सातारा जिल्ह्यात अण्णा हजारे यांच्या संघटनेने कायम सामजिक प्रश्‍नांवर जोरदार आंदोलने केली होती आता पुन्हा एकदा नव्याने बांधणी होत असल्याने आणि संस्थेच्या विश्‍वस्तपदावर सातारच्या व्यक्तीला संधी मिळाली असल्यामुळे साताऱ्यातील सामाजिक प्रश्‍न आता राज्य व केंद्रस्तरापर्यंत पोहचवून त्याची सोडवणूक होणे सहज शक्‍य होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)