सातारा: अक्षय तृतीयेच्या मुहर्तावर कोटींची उलाढाल

सराफ बाजारात मोठी उलाढाल ; बांधकाम क्षेत्रातील उलाढाल मंदावली

सातारा -साडे तीन मुहर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा मुहर्त साधत सातारच्या सराफा कट्यावर 15 लाखांची उलाढाल झाली आहे. सातारकरांनी सोने खरेदीसह,कार,होम अप्लायन्सेस खरेदीला पसंती दिल्याने साताऱ्याच्या बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल झाली.मात्र त्या तुलनेत रियल इस्टेटमध्ये फारशे तेजीचे वातावरण दिसले नाही.

या दिवशी सोने खरेदी व दान करण्याची धार्मिक परंपरा आहे.या दिवशी खरेदी केल्यास त्याचा क्षय होत नाही. ते चिरंतन टिकते म्हणून सुवर्ण खरेदीला विशेष महत्त्व आहे. येथील सराफ बाजारात रात्री उशिरापर्यंत सोने खरेदीसाठी गर्दी होती. सोन्याचा दर 31 हजारांच्या वर होता तरीही ग्राहकांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत थोडी का होईना खरेदी केली. शहरातील सराफ बाजारपेठेत सुमारे 10 ते 15 लाखांची उलाढाल यानिमित्ताने झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सोने खरेदीशिवाय आजचा मुहूर्त साधत अनेकांनी दुचाकी, नवीन टीव्ही, फ्रीज, आटा चक्की अशा वस्तूही खरेदी केल्या. संपूर्ण बाजारामध्ये गर्दी दिसून येत होती. दुचाकी,चार चाकी गाड्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढल्याने वाहन क्षेत्रात सुमारे तीन कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. मात्र बांधकाम व्यवसायिकांना या अक्षय तृतीयेला फारसा लाभ झाला नाही. सातारा शहरात सुरू असलेल्या अनेक गृह प्रकल्पांमध्ये साधारण तीनशे सदनिका पैकी केवळ बावीस सदनिकाच नोंदनीकृत झाल्याची माहिती बांधकाम व्यवसायिकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)