सातारारोडमध्ये अट्टल चोरटा गजाआड

सातारा – वडूथ ते सातारारोड ( ता. कोरेगाव) रस्त्यावर दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. यश बाबू भोसले उर्फ नाना पाटेकर वय 19 रा. आसनगाव, ता. सातारा असे संशयीताचे नाव आहे. त्याच्याकडून 25 हजार रोख, मोबाइल हॅंडसेट, छोटया आकाराचे चाकू असे साहित्य जप्त करण्यात आले. भोसले याची कसून चौकशी केली असता तीन महिन्यापूर्वी त्याने त्याच्या साथीदारांसह रहिमतपूर येथील चांदणी चौकात घरफोडी केल्याची कबुली दिली.

भोसले व त्याच्या टोळीने सातारा, कोरेगाव, रहिमतपूर परिसरात पंधरा घरफोड्या व जबरी चोऱ्या केल्या असून त्याला रहिमतपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस निरिक्षक विजय कुंभार यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, रामा गुरव आनंदराव भोईटे, संतोष पवार शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत रवि वाघमारे, विक्रम पिसाळ, निलेश काटकर, करिष्मा नवघणे यांनी सहभाग घेतला होता.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)