सातारमध्ये लवकरच ब्रेक टेस्ट ट्रॅक 

संग्रहित छायाचित्र

गुरूनाथ जाधव

कराड येण्या जाण्याचा आर्थिक भुर्दंड वाचणार 
सातारा : सातारा जिल्हयाचे ठिकाण असून सातारा उपप्रादेशिक कार्यालयाला स्वत:चा ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने ऑटो रिक्षा,तसेच जड वाहनांची गैरसोय होत होती. या बाबत लवकरच सातारा मध्ये स्वत:चा ब्रेक टेस्ट ट्रॅक लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी प्रभातशी बोलताना दिली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुरूवातीला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व व्यावसायिक वाहनांचे पासिंग करून मिळत होते. मात्र शासन परिपत्रक नियमानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅंकचा अवलंब करूनच पासिंग करणे बंधनकारक केल्यामुळे कराड येथे जावुनच पासिंग लागत होते. सातारा जिल्हयातील वाहन चालक, मालकांना सातारा ते कराड येण्या जाण्याचा आर्थीक भुर्दंड सोसावा लागत होता.

सातारा हे जिल्हयाचे ठिकाण असुन या कार्यालयात स्वतंत्र ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याबाबत मुंबई खंडपीठ यांच्याकडे जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. जनहित याचिका क्रमांक 28/2013 मधील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी प्रत्येक परिवहन कार्यालयाकडे स्वत:ची किमान 250 x 6 मीटर लांबी-रूंदीची जागा असलीच पाहिजे असा आदेश जारी करून सदर जागेच्या उपलब्धते विषयी दिनांक 20-10-2016 रोजी होणार्या सुनावणीच्या वेळी शासनाला शपथपत्र दाखल करण्याच्या सुचना जारी केल्या. याबाबत सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकरता जागा उपलब्ध करणेसाठी दिनांक 2-2-2018 रोजी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात झालेल्या चर्चेप्रमाणे मौजे वर्ये, तालुका जि.सातारा येथील गट क्रमांक 486, हिस्सा, क्रमांक 2 मधील गावचे गायरान मोफत जागेचा 7/12 मधील 6 हेक्‍टर 53 आर एवढी जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरची जागा जनहित याचिका क्र 28/2013 मधील निर्देशानुसार 250 x 6 मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्याकरता योग्य असुन 6 हेक्‍टर 53 आर एवढया जागेपैकी 3 हेक्‍टर इतकी जागा परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी या कार्यालयाच्या नावे वर्ग करण्यात यावी अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी प्रभातशी बोलताना दिली.

खा. श्री . छ. उयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हयातील वाहन चालक मालक यांच्या या नित्याच्या होणाऱ्या त्रासाबदृल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात बैठक घेवुन तातडीनं याबाबत सकारात्मक पावले उचलण्याबाबत सांगितले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी दिली आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)