सातारमधील रस्त्यांच्या कामांसाठी 3 कोटी 36 लाखांचा निधी

सातारा – सातारा शहरातून जाणाऱ्या प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्‍यातील शेरेवाडी ते कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा या प्रमुख जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी 2018- 19 च्या अर्थसंकल्पात 3 कोटी 36 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून या चारही कामांसाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने या रस्त्यांची लवकरच दर्जेदार सुधारणा होणार आहे.

बेल्हे शिक्रापूर, जेजुरी, लोणंद ते सातारा या राज्यमार्ग 117 मधील सातारा शहरातील पोवई नाका ते पोलीस कवायत मैदान या भागाची सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पात 65 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सातारा, कोरेगाव ते पंढरपूर, मोहोळ राज्यमार्ग 141 या रस्त्यावरील सातारा पंचायत समिती ते जिल्हा परिषद चौक या भागाची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

-Ads-

सातारा तालुक्‍यातील राज्यमार्ग 140 ते सोनगाव कुमठे, आसनगाव रस्ता प्रजिमा 31 मधील शेरेवाडी ते कुमठे या भागाची सुधारणा करण्यासाठी 51 लाख रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सातारा, गजवडी, ठोसेघर ते चाळकेवाडी या प्रजिमा 29 रस्त्यामधील बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा या भागाची सुधारणा करण्यासठी 1 कोटी रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

या सर्व कामांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेवरुन निधीची तरतूद झाली असून तातडीने शासकीय सोपस्कार पुर्ण करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी आणि रस्त्यांची कामे दर्जेदार करावीत, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)