सातारच्या श्‍लोक घोरपडेचा सुपरक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये द्वितीय क्रमांक

सातारा – संपुर्ण देशस्तरावर आयोजीत केलेल्या गॉड स्पिड रेसिंग अँड एमआरएफ मोग्रिप सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2018 स्पर्धेत सातारचा श्‍लोक घोरपडे हा द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरला आहे. श्‍लोक विक्रम घोरपडे हा सध्या के. एस. डी. शानभाग विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे.

दरवर्षी या मानांकित गॉड स्पिड रेसिंग अँड एमआरएफ मोग्रिप सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2018 स्पर्धेत आत्तापर्यत श्‍लोकने सलग झालेल्या सहा ठिकाणी सातत्याने दुसरा किंवा तिसरा येण्याचा बहुमान पटकावला. यावर्षी कोची, गोवा कोईमतूर, जयपुर, नासिक व नुकत्याच डिसेंबर मध्ये बडोदा गुजरात येथे झालेल्या सहाव्या स्पर्धेत श्‍लोकने दुसरा क्रमांक मिळवला.

-Ads-

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी श्‍लोक याला कोल्हापूर येथील नॅशनल रायडर कोच आशुतोष काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. श्‍लोकच्या या यशाबद्दल त्याचे आजोबा व केएसडी शानभाग विद्यालयाचे संस्थापक, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संकेत शानभाग, उषा शानभाग, विक्रम घोरपडे, शाळेच्या संचालिका आंचल घोरपडे, मुख्याध्यापिका रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी, सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)