सातारच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजची पाहणी

सातारा – सातारा शहरातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजच्या जलसंपदा विभागाच्या कृष्णानगर येथील जागेची खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुणे व मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता पथकाने बुधवारी पाहणी केली. येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या बैठकीमध्ये महाविद्यालयाच्या संदर्भात अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देवून वैद्यकीय समितीचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर व डॉ. संजोत कदम व इतर सहकारी उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने काही तांत्रिक तपशीलाची सविस्तर माहिती उदयनराजे यांनी घेतली. पथकाला शुभेच्छा देताना खा. उदयनराजे यांनी लवकर काम सुरू करा, असा प्रेमळ आग्रह धरला. पथकाने कृष्णानगर येथील पंचवीस एकर जागेची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या विविध दालनांसह आस्थापनेची माहिती घेतली. जिल्हा रुग्णालयाचे सक्षमीकरण, येथील 242 कॉटची संख्या350 पर्यंत पोहचवणे तसेच नवीन रोस्टरनिहाय पद निर्मितींना मान्यता, ऑपरेशन थिएटरचे अद्ययावतीकरण यावर चर्चा करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)