सातारच्या अधिकार्‍यांकडून कराड बसस्थानकाची पाहणी

दोन महिन्यात उद्घाटन करण्याची दिली ग्वाही

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री निधीतून येथील बसस्थानकासाठी सुमारे अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून होत असलेल्या बसस्थानकाची पाहणी गुरुवारी सातारा येथील अधिकार्‍यांच्या पथकाने केली. बसस्थानकाचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून येत्या दोन महिन्यात त्याचे उद्घाटन करणार असल्याची ग्वाही सातारा विभागीय अभियंता प्रियांका काशिद यांनी दिली. यावेळी कराड आगारप्रमुख जे. डी. पाटील यांची उपस्थिती होती.
अभियंता काशिद यांनी सुमारे दोन तास बसस्थानकात फिरुन विविध कामांची पाहणी केली. प्रवाशांना बसण्यासाठी आसने, पिण्याच्या पाण्याची सोय, लाईटच्या ट्रान्सफार्मची जोडणी आदी कामे अपूर्ण राहिलेली आहेत. ती येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याबाबत आगारप्रमुखांना सूचना केल्या. त्यानंतर एसटी वाहक, ठेकेदार यांच्यांशी त्यांनी चर्चा केली. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच कराड येथे अद्ययावत बसस्थानक उभे राहिले आहे. त्यामुळे बसस्थानकाचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते घेण्याचा मनोदय व्यक्त करत याबाबत त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कराड बसस्थानकाच्या उद्घाटनाला आता नवीन वर्षाचा मुहूर्त मिळाल्याचे यावरुन सध्या तरी स्पष्ट होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)