सातारचा मानदंड आयुर्वेदीय अर्कशाला (भाग- १ )

ग्रंथोक्‍त पद्धतीने काटेकोररित्या उत्तमातील उत्तम कच्चा माल वापरुन तयार केलेली गुणवत्तापूर्ण औषधे हे अर्कशालेचे सातत्याने वैशिष्ट्य राहिले आहे. यांत्रिक खल आले तरीही 1000 वेळा खलायचे औषध आजही 1000 फेरे झाल्याशिवाय उत्पादन केले जात नाही. आसवांच्या बाबतीतही कोणतेही बाहेरुन अल्कोहोल न घालता सहा महिने सागवानी पिंपात ठेवून ती नैसर्गिकरित्याच पूर्णत: तयार केली जातात.

एका प्रज्ञावंताने 90 वर्षापूर्वी आयुर्वेदीय अर्कशालेची स्थापना केली. डॉ. मो. ना. आगाशे हे त्या प्रज्ञावंताचे नाव आजही साताकरांच्या घराघरातून आदराने घेतले जाते. डॉ. आगाशे हे त्या काळातील मान्यवर अशा ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधून एम. बी.बी. एस. झाले होते व त्यांनी साताऱ्यात आपला वैद्यकीय व्यवसाय नावारुुपास आणलेला होता. स्वत: ऍलोपॅथीचे मान्यवर पदवीधर यशस्वी डॉक्‍टर असूनहही त्यांना आयुर्वेदाचीही जिज्ञासा होती आणि त्यातूनच त्यांनी आयुर्वेदाचाही सखोल अभ्यास केला होता.

सातारचा मानदंड आयुर्वेदीय अर्कशाला (भाग- २ )

ऍलोपॅथीने जरी झटपट गुण येत असला तरी मुळातून शरीरप्रकृतीची सुधारणा करण्यासाठी आयुर्वेदिक उपचाराचे वेगळे महत्व त्यांनी जाणले होते. वनस्पती, भस्मे आणि त्याच बरोबर ग्रंथोक्‍त पद्धतीने तयार केलेली आयुर्वेदिक औषधे वैद्यांना आणि रुग्णांना जर सहजी उपलब्ध झाली तर ती मोठीच समाजसेवा होईल. यासाठी अशी उत्पादने करणारी संस्था स्थापना करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि 1926 साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर या तरुण, यशस्वी डॉक्‍टरांनी स्वत: भांडवल घालून स्वमालकीची आयुर्वेदीय अर्कशालेची स्थापना केली.
ईवलेसे रोप दोनच कामगार, तीन खल, एकच भट्टी, काहीशी पडलेली छोटीशी इमारत यावर अर्कशालेचे रोपटे लावले गेले.

अरुण गोडबोले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)