सातारकावस्ती शाळेच्या यशाची परंपरा कायम

  • शिष्यवृत्ती प्रज्ञा शोध नवोदय परीक्षेमध्ये 17 विद्यार्थी उत्तीर्ण

दावडी, दि. 31 (वार्ताहर) – खेड तालुक्‍यातील रेटवडी गावची सातारकावस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी 1991पासून शिष्यवृत्ती प्रज्ञा शोध नवोदय परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही शाळेतील 17 विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत. यामध्ये समृद्धी संजीव केंजळे हिने राज्यात सहावा क्रमांक पटकविला आहे. शाळेतील शिक्षकांनी केलेले दर्जेदार मार्गदर्शन आणि अविरतपणे विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेशासाठी विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले आहेत, अशा माहिती मुख्याध्यापक सोपान मांजरे यांनी दिली.
शाळेच्या गुणवत्तेसाठी प्रगती रेटवडे (कड) यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम हेच शाळेच्या प्रगतीसाठी पोषक ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाचे मोल पालक ग्रामस्थांनी लॅपटॉप, पुस्तके आणि स्मृतीचिन्ह बक्षीस देऊन कृतज्ञतापूर्वक व्यक्त केले. सदर शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक दीपक रेवडे यांचे सहकार्य लाभले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील समृद्धी केंजळे, प्रणव जाधव, कुणाल सांडभोर, अथर्व रेटवडे, ज्योती पवार, स्मिता गाडे, संस्कृती वाबळे, साहिल पवार, सोमनाथ टिजगे, सानिया पवार, प्रज्ज्वल राळे, समृद्धी काळे, प्रतीक्षा पवार, मानसी कचरे यांचा व शिक्षकांचा सन्मान करून पालकांनी नवीन पायंडा पाडला. शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन, निबंध लेखन, वक्तृत्व, बाल आनंद मेळावा, वृक्षारोपण, नन्ही कली, जवानांसाठी राख्या तयार करणे व इतर उपक्रमातील प्रथम तीन क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्कार युवा फाउंडेशनतर्फे शालेय उपयोगी वस्तू तसेच जी.बी. पवळे असोसिएशन मुंबईतर्फे प्रेरणा पुरस्कार प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवातील तालुका स्तरावरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या मुला-मुलींच्या संघाचा गुणगौरव करण्यात आला. याप्रंसगी सुरेश मांदळे, मारुती जरे, दिनेश ठाकूर, उज्ज्वला पिंगळे, नंदकुमार वाघमारे, कविता बटवाल, अस्मिता वाकचौरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)