सातव्या वेतन आयोगासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाचा संपाचा इशारा

7, 8 व 9 ऑगस्ट रोजी करणार संप 

मुंबई – सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. अधिकारी-कमचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांवर राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत महासंघाने 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2018 या कालावधीत संप आंदोलन करणार असल्याचे गुरूवारी जाहीर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य सरकारने 1 जानेवारी 2016 पासून केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याचे मान्य केले आहे. या निणर्याची अंमलबजावणी करावी आणि त्या दरम्यान अंतरिम वाढ मिळावी. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, महिला कमचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन रजा मिळावी, अधिकाचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर सेवासुविधा द्याव्यात, प्रशासनातील 1 लाख 80 हजार रिक्त पदे सममर्यादेत भरावीत आदी महासंघाच्या मागण्या आहेत.

राज्यातील अधिकाऱ्यांना वेतनानुषंगिक आर्थिक लाभ मिळेपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही ते लाभ राज्यात देण्यात येऊ नयेत, असा आग्रहही अधिकारी महासंघाने धरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)