सातबारा संगणकीकरणाला गती द्या

जिल्हाधिकारी राम


511 गावांतील काम अजून अपूर्ण

पुणे- ई फेरफार प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या सातबारा संगणकीकरण करण्याचा कामाला गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. जिल्ह्यात एकूण 1,911 गावे आहेत. यापैकी 1,400 गावांतील सातबारा उतारे अद्ययावत करण्यात आले. उर्वरित 511 गावांमधील सातबारे उतारे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यात सुमारे 14 लाख सातबारे उतारे आहेत. त्यामुळे संगणकीकरणास वेळ लागला. यामध्ये प्रामुख्याने इंटरनेटची कनेक्‍टिव्ही समस्या होती. ती दूर करण्यात येत आहे. सातबारा संगणकीकरण हा महत्त्वाचा विषय आहे. हे काम लवकर झाले, तर नागरिकांना ऑनलाइन सातबारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत
– नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे.

भूमी अभिलेख विभागाने ई- फेरफार हे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. ई-फेरफारची प्रत्यक्ष अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी स्टेट डाटा सेंटर या ठिकाणे स्थापित केलेले सातबारे उतारे हे हस्तलिखित सातबारा उताऱ्यांशी तंतोतंत जुळणे आवश्‍यक आहे. या डाटामध्ये एकही चुक राहता कामा नये. तसेच डाटा सेंटरमधील डाटा हा बिनचुक असणे आवश्‍यक आहे. यासाठी शासनाने मागील वर्षी सातबारा उताऱ्यामधील दुरुस्तीसाठी “एडिट मॉड्यूल’ ही सुविधा उपलब्ध करून दिली.

-Ads-

यानंतर तपासणी केली असता, काही सातबारे उतारे हे संगणकीकृत सातबारे उताऱ्यांशी तंतोतंत नसल्याचे दिसून आले. त्यानंतर भूमि अभिलेख विभागाने चावडी वाचन ही मोहीम हाती घेतली. याची सुरूवात 1 मे 2017 पासून सुरू करण्यात आली. चावडी वाचन मोहिमेत आढळलेल्या चुका तसेच तहसीलदारांनी केलेल्या तपासणीमध्ये ऑनलाइन सातबारा उताऱ्यांमधील चुकांची दुरुस्ती करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)