सातबारा संगणकीकरणाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांचे प्राधान्य

प्रभात वृत्तसेवा
पुणे- सातबारा संगणकीकरणाच्या कामास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमध्ये 100 टक्‍के सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 80 हजार डिजिटल सातबारे उतारे देण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने सातबारा संगणकीकरणाचे काम हाती घेतले आहे. मागील एक वर्षांपासून याकामाने गती घेतली आहे. यापूर्वी सातबारा उतारा ऑनलाईन पाहता येत होता. त्याची प्रतही डाऊनलोड करून घेता येते. मात्र हा सातबारा उतारा शासकीय कामांसाठी ग्राह्य धरला जात नव्हता. त्यामुळे सातबारा उतारा मिळविण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. सातबारा उतारा घरबसल्या देण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा उतारा देण्यास दि. 1 मे 2018 पासून सुरुवात केली आहे. हा सातबारा उतारा सर्व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच सातबारा उताऱ्यावर खातेदारांची नावे, इतर हक्कातील शेरे, या सर्व बाबी मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे हवेली तालुक्‍यात सातबारा संगणकीकरणाच्या कामास थोडा वेळ लागत असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

सध्यस्थितीत सातबारा संगणकीकरणाचे कामे वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्‍यांमध्ये सातबारा संगणकीकरणाचे काम जूनअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एक ऑगस्टपासून जिल्ह्यतील सर्व सातबारे उतारे डिजिटल स्वाक्षरी असलेले मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)