सातत्यात कमी पडू नका …

   संस्कार

   अरुण गोखले

आपण खूप गोष्टी ऐकतो, वाचतो, एकमेकांना सांगतो . पण त्या गोष्टीतून नेमक काय शिकवले जाते ते जाणून घेत नाही. ससा आणि कासवाची गोष्ट आहे. तुमच्या ओळखीची. अनेकदा ऐकलेली, वाचलेली. पण खरं सांगू त्याचा नेमका अर्थ काय ते तुम्हाला न कळलेली ही गोष्ट.

एका तलावाजवळ ससा आणि कासव राहात होते. ते एकमेकांचे मित्र होते. एकदा ससा कासवाला म्हणाला, “आपण शर्यत लावूया. ते समोरचे झाड आहे ना? तिथ पर्यंत धावत जायचे, पाहू कोण सर्वात पुढे जातो ते.’ बिचारे कासव आपली धाव ओळखून होते. पण केवळ मैत्रीपोटी त्याला नाही म्हणता येईना. शेवटी नाईलाजाने ते बिचारे हो म्हणाले. त्या दोघांनी पोपटाला साक्षीदार बनवले. पोपटाने शिट्टी वाजवताच ससा मोठ्या वेगाने धावत सुटला. तो त्याच्या विजय लक्षाच्या अगदी जवळ गेला. त्याने विचार केला आत्ता काय मी तर जवळच आलो आहे. जरा थांबूया मग पुढे जाऊ. झालं, असा विचार मनात आला आणि ससा झुडपात विसावला.

कासव मात्र हळूहळू पण सातत्याने चालत राहिले. त्याने अथक प्रयत्न केले. ते ससा जिथे होता त्या जागेपर्यंत आले. त्याने पाहिले पण त्याला ससा कोठेच दिसला. त्याच्याही मनात असा विचार आला, थोडा आराम करावा. पण त्याने तो विचार झटकून टाकला. आपले सातत्य कायम राखत त्याने आपली वाटचाल पुढे चालू ठेवली. त्यामुळे सशाच्या आधी कासवच झाडापाशी जाऊन पोहोचले.

त्याबरोबर पोपटाने मोठी शिट्टी वाजवली. शिट्टीचा आवाज कानावर पडताच ससा जागा झाला. त्याला स्वत:ला कधी झोप लागली ते कळलेच नाही. त्याने डोळे उघडून समोर पाहिले तर काय! ते संथ गतीने चालणारे कासव त्याच्या आधी ठरलेल्या झाडापाशी जाऊन पोहोचले होते. कासवाने ती शर्यत जिंकली होती. आता मला सांगा की खरं तर ससा पळण्यात फार जलद असूनसुद्धा तो ती शर्यत मात्र जिंकू शकला नाही. कारण काय! तर त्याने आपल्या प्रयत्नात सातत्य राखले नाही. यावरून आपण कोणती शिकवण घ्यायची? जोवर आपले साध्य पूर्ण होत नाही. ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत थांबायचे नाही. कष्टाला, सातत्याला, मागे पडायचे नाही, कारण जो सतत चालत राहतो तोच यशस्वी होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)