सातत्यपूर्ण अभ्यासच हमखास यशाचा मार्ग

तहसीलदार दीपक पाटील : काकडे विद्यालयाच्या दहावी, बारावीच्या गुणवंतांचा सत्कार
शेवगाव  – विद्यार्थ्यांचे दहावी, बारावीतील नेत्रदीपक यश कौतुकास्पद आहे. मात्र यशाने हुरळून न जाता ही गुणवत्ता भविष्यात तशीच टिकवून ठेवावी. विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक आपल्याच आवडीचे क्षेत्र निवडावे. सातत्यपूर्ण अभ्यास व आत्मविश्‍वासाची जोड हमखास आपणास यशाकडे घेऊन जाईल, असे प्रतिपादन तहसीलदार दीपक पाटील यांनी केले.
येथील आबासाहेब काकडे विद्यालय व कनिष्ठ महाविदयालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य भानुदास भिसे, उपप्राचार्य सुनील आढाव, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षक चंद्रकांत आहेर, विस्तार अधिकारी शोभा नाईक, जगन्नाथ गावडे, प्रा. लक्ष्मण बिटाळ आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नाव कमवले पाहिजे. कोणताही न्यूनगंड बाळगू नका. भविष्यातील संधीचे सोने करा. आपले काम आपण स्वतः करा. पालकांना फक्‍त सत्कारासाठीच पुन्हा पुन्हा बोलवा.
बारावी विज्ञान शाखेतील भार्गवी काकडे, शीतल सुडके, प्रतीक्षा पवार, अभिषेक डांगे, कला शाखेतील वर्षा शिंदे, प्रज्ञा झिरपे, शुभांगी वीर तर दहावी सेमी माध्यमात स्नेहा लांडगे, रोहित जाधव, शुभम निमसे, हर्षवर्धन पाटील, तर मराठी माध्यमात बबन राठोड, आरती भाबड , वैष्णवी ढोले तसेच 90 टक्‍क्‍यांवरील 23 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बारावी वर्गाच्या निकालाचे वाचन उपप्राचार्य सुनील आढाव तर दहावीच्या वर्गाचे वाचन उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे यांनी केले.
सूत्रसंचलन गोविंद वाणी यांनी केले तर आभार वंदना पुजारी यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)