साडे सात लाखाच्या मालासह ट्रक चालक फरार

सातारा,दि.8 (प्रतिनिधी)
साताऱ्यातील कंपनीतून औरंगाबाद येथे घेऊन निघालेल्या मालासह फरार झालेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरज साठे रा. औरंगाबाद असे गुन्हा दाखल असलेल्या चालकाचे नाव आहे.
संभाजीनगर,सातारा येथील प्रमोद रोमण यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मुथा फाऊंडेशन प्रा.लि. या कंपनीतून औरंगाबाद येथे कास्टींग ब्लॉक पोहचवायचे होते. त्यासाठी रोमण यांच्या देगाव येथील कार्यालयात सुरज साठे हा आला व माल पोचवण्यास तयार झाला. त्यावेळी रोमण यांनी त्याच्याकडे असलेल्या एम एच सीटी या ट्रकची कागदपत्रे पाहीली व त्याला माल नेहण्यास कळवले. त्यानंतर सुरज हा सुमारे साडे सात लाख रुपये किमंतीचे कास्टींग ब्लॉक घेऊन निघाला. मात्र तीन दिवस झाले तरी, सुरज हा औरंगाबद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीतील बजाज कंपनीत पोहचला नाही. त्याने दिलेले मोबाईलवर रोमण यांनी संपर्क साधला मात्र तो झाला नाही. त्यामुळे सुरज साठे रा. औरंगाबाद याच्याविरोधात प्रमोद दत्तात्रय रोमण रा. संभाजीनगर यांच्या तक्रारीवरुन सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास पो.उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)