साडे सहा लाखाच्या चहासह आरोपी जेरबंद

सातारा डीबीची कारवाई; साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

सातारा – सातारा शहरातील औद्योगिक वसाहतीत चोरलेल्या चहा पावडरसह आरोपींना जेरबंद अवघ्या एका दिवसात जेरबंद केले. दि. 3 ते 12 नोव्हेबर दरम्यान गोदामातून सहा लाख 97 हजाराची चहा पावडर गायब करण्यात आली होती. याप्रकरणी सातारा शहरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्या गोदामच्या व्यवस्थापकासह एका कामगाराला अटक केली आहे. दशरथ उत्तम फडतरे (रा.शनिवार पेठ, सातारा), विलास हरी गायकवाड (रा.केसरकर पेठ,सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका गोदामातून साडे सहा लाखाची चहा पावडर गायब झाली होती. ही घटना मंगळवार दि. 13 रोजी समोर आली. त्यानंतर जैमिन दिलीप शहा यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान त्यांनी गोदामाच्या चाव्या सांभाळणाऱ्या कामागारांवरच संशय व्यक्त केला होता. त्यानंतर याप्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे फिरवली होती.

सहाय्यक पोलिस अधिक्षक समीर शेख, पो.नि.नारायण सारंगकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सुचना दिल्या होत्या. मिळालेल्या सुचनेनुसार स.पो.नि. बी.जी. ठेकळे यांनी अवघ्या एका दिवसात मुद्देमालासह आरोपींना जेरबंद केले. आरोपींनी चोरलेला माल एका ठिकाणी साठवला होता. साठवलेला माल विक्री करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. यावेळी पोलिसांनी चोरलेला माल,एक टेम्पो असा 9 लाख 47 हजाराचा मुेद्माल जप्त केला.
या कारवाईत स.पो.नि. बी.जी. ठेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. संतोष भिसे,मुल्ला,गायकवाड साळुंखे,भोसले,चव्हाण,ढाणे, धीरज कुंभार, डुबल यांनी सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)