साडे बारा कोटींच्या विकास कामांना स्थायीची मंजुरी

पिंपरी – बोपखेल फाटा ते आळंदी रस्त्यावर नागरिकांच्या सोयीसाठी बस स्टेशन बांधण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांच्या खर्चास व विविध विकास कामांच्या सुमारे 12 कोटी 33 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

प्रभाग क्रमांक 17 मधील महापालिका इमारतींच्या दुरुस्तीसाठी 33 लाख 94 हजार, प्रभाग क्र. 19 मधील वाल्हेकरवाडी येथील विविध ठिकाणी देखभाल, दुरुस्ती, सुधारणा व स्थापत्य विषयक कामांसाठी 33 लाख 90 हजार, प्रभाग क्र. 4 मधील दिघी-बोपखेल येथील विविध ठिकाणच्या चरांची व डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 31 लाख 18 हजार रुपयांच्या खर्चास स्थायीत मान्यता देण्यात आली. पिंपरीनगर येथील डिझेल शवदाहिनी चालवणे व निगा राखण्यासाठी 31 लाख 66 हजार, चऱ्होली मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. 1 चिखली व शेलार वस्ती, सोनावणे वस्ती परिसरात भुयारी गटर नलिकेसाठी 27 लाख 33 हजार रुपयांच्या खर्चास यावेळी मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 27 येथील रहाटणी नखातेनगर, रहाटणी फाटा व परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 28 लाख, जल शुद्धीकरण केंद्र सेक्‍टर 23 करिता द्रवरूप पॉली ऍल्युमिनीयम क्‍लोराईड खरेदीसाठी 1 कोटी 15 लाख, प्रभाग क्र. 17 मध्ये वार्षिक ठेकेदारीने ड्रेनेज लाईन व चेंबर्सच्या देखभालीसाठी 22 लाख 17 हजार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्याबाहेरील बोपखेल फाटा ते दिघी जकात नाका 60 मीटर रुंद रस्त्याकरिता खासगी जमिनीचे भू-संपादन, प्रभाग 29 मधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक ठेकेदारीने देखभाल व दुरुस्तीसाठी 24 लाख रुपयांच्या खर्चास स्थायीने मान्यता दिली.

प्रभाग क्र. 10 मधील संभाजीनगर, शाहूनगर परिसरात आवश्‍यकतेनुसार जल निःसारण नलिका टाकणे व तद्‌अनुषंगीक कामांसाठी 46 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 23 मधील पाण्याची टाकी कैलासनगर, समता कॉलनी, शिवशंभो कॉलनी, मोहटादेवी मंदिर व प्रभागातील इतर रस्त्यांचे डांबरीकरणासाठी 26 लाख 47 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)