साडे पाच लाख खर्चून बंधाऱ्याचे सर्व्हेक्षण

पिंपरी – शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्‍याची पाण्याची पातळी तपासणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ड्रोन सर्व्हेक्षण करण्यात येणार असून साडेपाच लाख रूपये खर्च केला जाणार आहे.

पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तत्कालीन लोकसंख्येनुसार पाणी वापर तसेच भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन बांधण्यात आला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकात महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्या वाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते. रावेत बंधाऱ्याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. सद्यस्थितीत रावेत येथील बंधाऱ्यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 30 एमएलडी जलउपसा करते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रावेत येथील बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधाऱ्याची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्पैत करण्यात येतात. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्यस्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी असल्याचे पाटंबधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. त्याबाबत त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांनाही सुचित केले आहे. सध्या पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत असल्याने बंधाऱ्यातील पाणी पातळी खाली जात आहे. त्याचा परिणाम पंपिंगवर होऊन पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांची बैठक झाली.

रावेत बंधाऱ्याच्या वरील बाजूस नदीपात्रा समोर ही योजना आवश्‍यक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. पाणलोट क्षेत्राचे सर्व्हेक्षण महापालिकेमार्फत करण्याचे ठरले आहे. या सर्व्हेक्षणात बंधाऱ्याची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्‍याची पाण्याची पातळी तपासणे आवश्‍यक आहे. हे काम तातडीने करणे आवश्‍यक असल्याने पाटबंधारे विभागामार्फत ड्रोन सर्व्हेक्षण करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

आगामी स्थायी समोर प्रस्ताव
सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून महापालिकेने दरपत्रक मागविले होते. निविदा न काढता सर्वात कमी दर सादर केलेल्या ठेकेदाराला काम देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 50 हजार रूपये हा लघुत्तम दर सादर करणाऱ्या राहुल देशमुख यांना निविदा न मागविता करारनामा करून थेट पद्धतीने काम देण्यात येणार आहे. या कामासाठी सन 2018-19 च्या अंदाजपत्रकातील पाणी पुरवठा विशेष योजना निधी या लेखाशिर्षाअंतर्गत रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे या कामाअंतर्गत उपलब्ध तरतूद पाच लाख रूपये इतकी आहे. त्यानुसार, हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)