साडे पाच लाखांची चोरी

देहुरोड – देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये चोरांनी सुमारे साडे पाच लाख रुपयांचा ऐवज पळवला आहे. किवळे येथून तीन लाख 80 हजार रुपये किंमतीचे 19 तोळे सोन्याचे दागिने तर रावेत येथील एका गोडाऊनच्या भिंतीला खड्डा पाडून 1 लाख 77 हजार 554 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गोविंद कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. दत्तनगर किवळे येथील सर्व्हे न. 68/3, फ्लॅट न. 74 मधून चोरट्यांनी एका सुटकेस मधील 6 तोळयांच्या चार सोन्याच्या बांगड्या, 6 तोळयांचे दोन सोन्याच्या पाटल्या, 4 तोळयांचे आणि 3 तोळयाच्या 10 नग सोन्याच्या अंगठया असे एकूण तीन लाख ऐशी हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.27) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

-Ads-

दुसऱ्या घटनेत अश्‍विन बाजीराव सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी ( ता.24 ) दहा वाजण्याच्या पूर्वी जी के इंटरपाईजेस नावाच्या गोडाऊनच्या भितीला होल पाडून अज्ञात चोरटयांनी 1 लाख ,26 हजार , 210 रूपये व 51 हजार, 337 रु. किंमतीचे नळजोडाचे साहित्य चोरले. देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)