साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

पुणे, दि.11 – शहरातील अन्न व औषध प्रशासनाने गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू आदींची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या 18 आस्थापनांवर कारवाई करून 6 लाख 46 हजार 511 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या अनेक दिवसांत झालेली ही मोठी कारवाई आहे, असे म्हणता येईल. शहरात अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा, पानमसालाची विक्री केली जाते. मध्यंतरीच्या काळात ही एफडीएची कारवाई थंडावल्यामुळे याची विक्री सर्रास होताना दिसत होती. दरम्यान 10 जुलै रोजी पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्‍त सं. भा. नारगुडे, सं. पा. शिंदे, अ. गो. भुजबळ, अ. अ. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)