साडेदहा तासांत चिमुरडी 36 किमी पोहली

जुन्नर तालुक्‍यातील करंजाळेची कन्या ः समुद्रात केली आव्हानात्मक कामगिरी

आळेफाटा-करंजाळे (ता. जुन्नर) येथील आर्या अविनाश जगताप या अकरा वर्षांच्या मुलीने 10 तास 32 मिनिटांत धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटरचे अंतर समुद्रात पोहून पार केले. तिने ही आव्हानात्मक कामगिरी पार पाडल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जुन्नर तालुक्‍यातील करंजाळे येथील रहिवासी असलेली आर्या जगताप ही कल्याण येथील गुरुनानक इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. तिने बुधवारी (दि. 12) मध्यरात्री दोन वाजता धरमरतर या ठिकाणाहून समुद्रात पोहण्यास सुरवात केली. ती दुपारी साडेबारा वाजता गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोहचली धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटरचे सागरी अंतर तिने अवघ्या साडेदहा तासांत पार करुन एक नवा विक्रम केला आहे. हे आव्हानात्मक सागरी अंतर पोहून पार करण्यासाठी ती डोंबिवलीतील यश जिमखान्यामध्ये प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस रात्र सराव करीत होती. तिची ही जिद्द पाहून यश जिमखान्याचे मालक राजू वडनेरकर यांनी आर्याला सरावासाठी अधिक वेळ पूल उपलब्ध करून दिला. तसेच उरण येथे आठवड्यातून दोन वेळा समुद्रामध्ये प्रशिक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. यापूर्वी आर्याने 8 मार्च रोजी महिलादिनी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किमी सागरी जलतरण अंतर केवळ 3 तास 20 मिनिटांत पोहून पार केले होते.
चौकट ः देशाचे नाव रोशन करायचेय
लहानपणापासून तिला पोहण्याची आवड आहे. तसेच बदलापूर, वाशी, ठाणे, बेलापूर, कल्याण, डोंबिवली नेरुळ येथे अशा अनेक ठिकाणी झालेल्या जलतरण स्पर्धेत आर्याने उत्तम कामगिरी केली आहे. मालवण येथील राज्य स्तरीय, गुजरात पोरबंदर व गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली आहे. दि. 25 नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तेजनार्थ कामगिरी केली आर्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. मला आंतरराष्ट्रीय इंग्लिश चॅनल पोहून देशाच नाव रोशन करायचे असल्याचे तिने सांगितले. आर्या जगताप हिची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून वडील अविनाश हे रिक्षा चालवून कुटुंबाचे देखभाल करतात. मुलीच्या स्वप्नाना बळ देण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)