साडेतीन टन प्लॅस्टिक जप्त

संयुक्त कारवाई : 40 हजारांचा दंड वसूल

पुणे : महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून शहरात बंदी असलेल्या प्लॅस्टिकची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई सुरू केली आहे. त्यांतर्गत सोमवारी लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर, तुळशीबाग, शुक्रवार पेठ, बोहरे आळी, रविवार पेठ येथील 80 दुकानांची तपासणी करण्यात आली.

यावेळी 8 दुकानांमध्ये बंदी घातलेल्या प्लॅस्टिक वस्तू तसेच कॅरिबॅग नॉनवोहन बॅग, सिंगल युज वस्तू जसे प्लॅस्टिक चमचे, ग्लास आदी आढळून आल्या. दुकानदारांकडून 40 हजार रुपये दंड आकारण्यात आला व 3.5 टन माल जप्त केल्याची माहिती महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही शिल्लक साठ्याची शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आल्याने ही तपासणी करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, क्षेत्र अधिकारी डॉ अरविंद धपाटे, सर्जेराव भोई यांनी कारवाईमध्ये भाग घेतला. पुणे पालिकेचे सहायक आयुक्त वैभव कडलख, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान व आरोग्य निरीक्षक राजेश रासकर, शाहू पोकळे, उमेश देवकर, अमोल पवार, संतोष कदम, संदीप नागवडे, भूषण सांगळे हे कारवाईत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)