3500 मिळकतधारकांनी मिळकतकर भरलाच नाही

पुणे – महापालिकेकडील एकूण मिळकतीतील सुमारे साडेतीनलाख मिळकतधारकांनी अद्याप मिळकत कराचा भरणाच केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी मुदतीत कर भरणा करावा आणि दंड टाळावा असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागातर्फे करण्यात आले आहे.

एक एप्रिल ते 27 मे या कालावधीत चार लाख 48 हजार 959 एवढ्या मिळकतधारकांनी सुमारे 516 कोटी सहा लाख रुपये करापोटी भरले आहेत. मात्र अद्याप साडेतीन लाख लोकांनी कराचा भरणा केला नाही. त्यांच्यासाठी 31 मे ही सवलतीसह कर भरण्याची मुदत असून, त्यानंतर शास्तीसह कर भरावा लागणार आहे.

याशिवाय महापालिकेतर्फे देण्यात येणारा अपघात विम्याचे संरक्षणही मुदतीत कर भरलेल्यांना होणार आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर मुदतीत कर भरण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)