साडेआठ हजार प्राध्यापकांना मानधन वाढीचा लाभ

पुणे – राज्य शासनाने वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या सहायक प्राध्यापकांचे मानधन दुप्पटीने वाढविले आहे. याचा राज्यातील 8 हजार 500 सहायक प्राध्यापकांना लाभ मिळणार आहे.

राज्यात 1 हजार 171 अनुदानित महाविद्यालये आहेत. ती पुणे, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर,नांदेड, पनवेल, सोलापूर या दहा विभागांत विभागलेली आहेत. या अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची बहुसंख्य पदे रिक्तच आहेत. ही पदे भरण्यावरील निर्बंध उठविण्यात आले असले तरी अद्याप भरतीला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. गेल्या दहा वर्षांत महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या सहायक प्राध्यापकांच्या संख्येत दिवसेंदिवसे वाढ झाली आहे. मात्र, त्यांच्या मानधनात शासनाने काहीच वाढ केली नव्हती. दरम्यान 5 नोव्हेंबर रोजी आदेश काढून शासनाने मानधन वाढवून प्राध्यापकांना दिलासा दिला आहे.

-Ads-

शासनाकडून पदवीस्तरावर प्रति तासासाठी 300 रुपयांवरून 500 रुपये, तर पदव्युत्तर स्तरावर 300 रुपयांवरून 600 रुपये याप्रमाणे मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी दिली आहे.

सखोल तपासणीनंतरच प्रस्तावांना मान्यता
महाविद्यालयांनी शासनाच्या अटी शर्तीची पूर्तता करून सहायक प्राध्यापकांची भरती केलेली असणे आवश्‍यक राहणार आहे. शासनाच्या नियमात न बसणाऱ्यांना मानधन वाढीचा कोणताही लाभ मिळणार नाही. मानधन वाढीचे प्रस्ताव मंजूर करताना उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांकडून सखोलपणे तपासणी केल्यानंतरच प्रस्तावांना मान्यता दिली जाईल, असेही माने यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)