पुणे,दि.1- मोफत साडी व पैशाचे आमिष दाखवून एका 55 वर्षाच्या महिलेला 70 हजाराचा गंडा घालण्यात आला. तीचे दागिने रुमालात बांधण्याचा बहाणा करुन रुमालात पुठ्ठा व खडे टाकून देण्यात आले.
याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला गुरुवारी सकाळी गुजरात कॉलनी येथून पायी चालली होती. यावेळी तीच्या जवळ एक व्यक्ती आला. त्याने इधर गली मे चलो पुजा चल रही है. मेरी चाची पैसे और साडी मोफत बांट रही हे असे म्हणून तीला एका गल्लीमध्ये घेऊन गेला. तेथे अंगावरील गंठण आणी मंगळसूत्र रुमालात बांधून ठेवण्यास सांगण्यात आले. यानंतर हा रुमाल घेऊन त्यामध्ये पैसे ठेवले असे सांगून पैसे ठेवल्याचा बहाणा केला. हा रुमाल फिर्यादीकडे देऊन चाची आनेवाली है रुमाल मत खोलो नही तो पैसे और साडी नही देंगी असे सांगत तो कोथरुडच्या दिशेने निघुन गेला. बराच वेळ झाला तरी तो न परतल्याने फिर्यादीने रुमाल खोलून बघितला. तेव्हा तीला त्यामध्ये पुठ्ठा आणी खडे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन.ए.मुंढे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)