साठवण तलावात आढळला तरुणाचा मृतदेह

राहाता – राहाता बाजारतळालगत असलेल्या नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावात नंदू पुंडलिक धीवर (वय 35, रा. पिंपळस) या युवकाचा मृतदेह आढळला. हा प्रकार आज (दि.27) सात वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बाजारतळालगत असलेल्या कातनाला पाणी साठवण तलावात शनिवारी सकाळी मदरशातील मुलांना एका युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांनी ही माहिती अमोल दत्तू बनकर यास दिली. बनकर यांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे यांना सांगितली. त्यानंतर साठे पालिका कर्मचारी अनिल कुंभकर्ण व राजेंद्र गुंजाळ यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गृहरक्षक दलाचे जवान शिवाजी अनाप व इतरांच्या मदतीने मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृत व्यक्तीच्या अंगात राखाडी रंगाची अंडर पॅंट व भगव्या रंगाचा टी शर्ट होता. बऱ्याच वेळानंतर मयताची ओळख पटली. मृत व्यक्ती पिंपळस येथील नंदू धीवर असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि. अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करत आहेत. धीवर यांच्यावर वैकुंठयात्रा सेवा साहित्य पुरविणाऱ्या संस्थेच्या वतीने दशरथ तुपे व सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)