साठवणीतील धान्यावरील किडींचे व्यवस्थापन (भाग पाच )

विविध हंगामांत कडधान्य, तृणधान्ये व गळीतधान्य पिके घेतली जातात. आपण चांगले उत्पादन घेत असलो तरी काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाकडे आपले दुर्लक्ष असते. नवीन धान्याची एकाच वेळी आवक झाल्याने दर कमी होतात. हे टाळण्यासाठी धान्य तीन ते चार महिने साठवण करून, अपेक्षित बाजारभाव असताना बाजारात आणल्यास चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, साठवणीमध्ये योग्य काळजी न घेतल्यास किडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते.धान्य साठवणीच्या काळात धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडीपासून साठवणीच्या धान्याचे संरक्षणार्थ उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते.

रासायनिक उपाय – ईथीलीन डायब्रोमाईडची (अमप्यूल) काच नळी (ईजेंक्षण) चे तोंड फोडून कापसाचा बोळा लावावा आणि काठी साह्याने धान्यात खुपसून कणगी ,कोठी चे तोंड 7 दिवस बंद करावे, 8 व्या दिवसी धन्यास मोकळी हवा लागू द्यवी, 3 मिली ची अमप्यूल 1 क्वीटल धान्यासाठी पुरेशी होते. हया नळ्या पोत्याच्या थपीत वापरावयाच्या असतील तर पोत्याची थप्पी 8 दिवस झाकून हवाबंध ठेवावी. एएलपी गोळ्या (अल्युमिनिअम फॉसफाईड) 1 टन धान्यास 3 ग्रामच्या 3 गोळ्या वापराव्यात. एएलपी पाऊडर : 1 टन धान्यास 10 ग्रामच्या 3 गोळ्या वापराव्यात गोदामातील रासायनिक उपायासाठी केंद्र सरकारकडून अधिकृत परवाना असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 उंदराच्या नियंत्रणासाठी – 1) गोदाम, घर आणि शेतात एकाच वेळी उंदीर नियंत्रण मोहीम घ्यावी. 2) दरवाजे घट्ट बसणारे असावेत, जेणेकरून उंदीर आतमध्ये शिरकाव करणार नाहीत. दरवाज्याला जमिनीच्या बाजूस पत्रा बसवावा. 3) खिडक्‍यांना व मोर्यांच्या तोंडावर लोखंडी जाळ्या बसवाव्यात. 4) घरात, गोदामात स्वच्छता ठेवावी आणि आजूबाजूची उंदरांची बिळे बुजवून घ्यावीत. 5) उंदीर पकडण्यासाठी पिंजरा, सापळा यांचा वापर करावा.6) विघटक सौम्य विष (अँन्टीकोऍग्युलंट) : उदा.रोडफरीन,रॅटाफीन, वरफेरीन,रॅटोनिल ब्रोमोडीओलीन,रॅक्‍युमिन यांचा वापर करावा, त्यासाठी 49 भाग पीठ+1 भाग खद्यतेल + एक भाग साखर + 1 भाग विघटक विष मिसळून तयार मिश्रण एका ठिकाणी 50 ग्रॅम आडोश्‍याला किमान 15 दिवस ठेवावे.उंदरांनी खाल्यास त्यांच्या रक्त वाहिन्या फुटून रक्त स्त्राव होतो व 5-6 दिवसांनीमोकळ्या जागी जाऊन मारतात.

7) झिंक फॉस्फाइड वापरावे. प्रथम 100 ग्रॅम पिठामध्ये 5 ग्रॅम तेल व 5ग्रॅम गूळ मिसळून त्याच्या गोळ्या 2-3 दिवस उंदरांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर ठेवाव्यात. त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर त्यात 3 ग्रॅम झिंक फॉस्फाइड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पिठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर ठेवाव्या, जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. मेलेले उंदीर पुरून टाकावे.

माणिक पांडुरंग लाखे 
विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) 
कृषी विज्ञान केंद्र दहीगाव ने.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)