साझ, सोनल, दक्ष अगरवाल यांचा मानांकितांना धक्‍का

रावेतकर करंडक सोलारीस क्‍लब अजिंक्‍यपद टेनिस स्पर्धा

पुणे: साझ तांदळे, सोनल पाटील, मान्या बरांगे, रूमा गैकिवारी आणि दक्ष अगरवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पराभव करताना येथे सुरु असलेल्या सोलारीस क्‍लब तर्फे आयोजित “रावेतकर करंडक’ सोलारीस क्‍लब अखिल भारतीय अजिंक्‍यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (16 वर्षाखालील) स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला.

कोथरूड येथील सोलारीस क्‍लब, मयुर कॉलनी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुलींच्या गटात साझ तांदळे हिने दुसऱ्या मानांकित लोलाक्षी कांकरीयाचा 8-7 (4) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. तर, सोनल पाटील हिने पुण्याच्या पाचव्या मानांकित सिया देशमुखचा 8-2 असा पराभव करून स्पर्धेत अनपेक्षित निकालाची नोंद केली. तर, बिगरमानांकित रूमा गैकिवारी हिने आठव्या मानांकित मोहीनी घुले हिचे आव्हान टायब्रेकमध्ये 8-7(1) असे परतावून लावले. तसेच मान्या बरांगे हिने सातव्या मानांकित संजीवनी कुतवळ हिचा 8-1 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली.

तर दुसरीकडे, मुलांच्या गटामध्ये दक्ष अगरवाल याने पाचव्या मानांकित प्रवण गाडगीळ याचे आव्हान 8-2 असे मोडून काढत स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदविला. तर, पुण्याच्या तिसऱ्या मानांकित प्रसाद इंगळे याने आर्यन हूड याचा 8-6 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. तर सहाव्या मानांकीत मानस धामनेने इशान देगामकरचा 8-5 असा संघर्षपूर्न पराभव करत आगेकूच नोंदवली.

सविस्तर निकाल 

मुलींचा गट : उप-उपांत्यपुर्व फेरी – खुशी शर्मा (1) वि.वि. काम्या परब 8-7(5), रूमा गैकिवारी वि.वि. मोहीनी घुले (8) 8-7(1), रैसा दलिच वि.वि. श्रृती नानजकर 8-5, मान्या बरांगे वि.वि. संजीवनी कुतवळ (7) 8-1, श्रावणी खवाळे (6) वि.वि. यश देसाई 8-3, गौतमी खैरे वि.वि. श्रावणी निकम 8-0, सोनल पाटील वि.वि. सिया देशमुख (5) 8-2, साझ तांदेळ वि.वि. लोलाक्षी कांकरीया (2) 8-7(4).

मुलांचा गट : उप-उपांत्यपुर्व फेरी –
साहील तांबट (1) वि.वि. शौर्य राडे 8-2, दक्ष अगरवाल वि.वि. प्रवण गाडगीळ (5) 8-2, प्रसाद इंगळे (3) वि.वि. आर्यन हूड 8-6, ओजस डाबस वि.वि. वेद पवार 8-1, मानस धमणे (6) वि.वि. इशान देगामवर 8-5, क्रिश नासा (4) वि.वि. ओम कहाड 8-3, आर्यन कोठस्थाने (8) वि.वि. केयुर म्हेत्रे 8-2, सिध्दार्थ जाडली (2) वि.वि. यश कोठारी 8-2.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)