साजिदच्या गैरवर्तवणुकीची तक्रार लाराने केली होती – महेश भूपती 

बॉलिवूडमध्ये  ‘#मी टू’ चळवळीअंतर्गत अनेक बडे अभिनेते आणि दिग्दर्शकांवर अत्याचाराचे आरोप होत आहे. यामध्ये दिग्दर्शक साजिद खान यांच्यावरही आरोप झाले होते. यासंबंधी टेनिसस्टार महेश भूपतीने मोठा खुलासा केला आहे. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री लारा दत्ता हिने साजिद खानच्या चुकीच्या आणि गैरवर्तवणुकीची तक्रार केली होती. लाराने लग्नाआधी सांगितले होते कि, साजिद खान तिच्या एका सहकलाकारसोबत गैरवर्तवणूक करत आहे, असे महेश भूपतीने एका मुलाखतीत सांगितले.

महेश भूपती म्हणाला कि, त्यावेळी हाऊसफुल चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही लंडनमध्ये होतो. लारा आणि तिची जवळची मैत्रीण हेअरड्रेसर्स होती. त्या दोघीही साजिद खानच्या गैरवर्तवणुकीची तक्रार करत असे. दरम्यान, हाऊसफुलमध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, दीपिका पादुकोण, जिया खान आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत होते. महेश भूपती पुढे म्हणाला कि, मी लाराला म्हणालो साजिदच्या वर्तवणुकीसाठी तुम्ही चौघेही जबाबदार आहेत. कारण तुम्ही त्या कृतीचा विरोध केला नाही.

दरम्यान, साजिद खानवर मंदाना करीमी, अहाना कुम्रा, सलोनी चोपड़ा आणि सिमरन सूरी सारख्या अभिनेत्रींनीं गैरवर्तवणुकीचे आरोप लावले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)