सागर मुखेकरला “जैन शासन रक्षक गौरव पुरस्कार” प्रदान

जैन संघ मंचरच्या वतीने झालेल्या बडीदीक्षा कार्यक्रमात केला सत्कार

मंचर-कवठे (ता. शिरूर) येथे काही दिवसांपूर्वी जैन धर्मगुरूंवर नशेत असलेल्या तरुणाने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये धर्मगुरूंचे प्राण वाचविणाऱ्या सागर मुखेकर या तरुणाला जैन संघ मंचरच्या वतीने जैन शासन रक्षक गौरव पुरस्कार आणि दहा ग्रॅम सोन्याची चैन देऊन गौरविण्यात आले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील जीवन मंगल कार्यालयात जैन साधू भव्यघोष विजयजी महाराज यांच्या बडीदीक्षा कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, कवठे गावचे सरपंच अरुण मुंजाळ, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कुमारपाल समदडिया, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया, रितेश शहा, बाबुलाल पुनामिया, विजयकुमार पुंगलिया, नवीन गुगळे, सुरेश पुंगलिया, प्रदीप श्रीश्रिमाळ, राजेंद्र भंडारी, नरेंद्र समदडिया, ललितकुमार बाफना, ललित राठोड उपस्थित होते.
यावेळी कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. पाणगे आणि स्टाफचा, तसेच जैन धर्मगुरूंना मदत करणाऱ्या सुधीर निकम आणि कवठे ग्रामस्थांचा देखील सत्कार करण्यात आला.यावेळी देवेंद्र शहा, चेतन बाफना, प्रदीप वळसे, डॉ. सुभाष पोकळे यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ.नरेंद्र लोहकरे, डॉ.ओंकार काजळे, डॉ.नामदेव पाणगे यांनी यावेळी तातडीने उपचार केले होते. कार्यक्रमप्रसंगी पारगाव, घोडेगाव, कवठा, पुणे, लोणी, शिरुर, मलठण, अवसरी बुद्रुक, नारायणगाव, संगमनेर, भंडारदरा, मालगाव-राजस्‌ थान, सोलापूर येथून जैन भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन आशिष पुंगलिया यांनी केले. अभिजित समदडिया यांनी आभार मानले. निरज समदडिया, अमोल पारेख, कमलेश शहा, प्रियेश गांधी यांनी व्यवस्था पाहिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)