सागरिका घाटके ‘डाव’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई :  प्रेमाची गोष्ट मधून प्रेक्षकांच्या मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळेस ती ‘डाव’ या चित्रपटात सर्वांना दिसणार आहे.  ‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे तिने रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. 

हिंदीसोबतच मराठीतही अभिनयाची छाप टाकणारी  सागरिका ‘डाव’ या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानंतर ‘डाव’ हा सागरिकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे. माजी क्रिकेटपट्टू झहीर खान याच्याशी साखरपुडा झाल्यावर ती काही दिवसांपुर्वी चर्चेत आली होती. नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘डाव’ची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या सस्पेंस-थ्रीलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे. सागरिका यामध्ये मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. यामध्ये ती नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारची भुमिका करताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वांना तिच्या अभिनयाविषयी उत्सुकता लागून राहीली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण अद्याप याची निश्चित तारीख सांगण्यात आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)